Sugarcane FRP : ‘एफआरपी’ची पूर्ण रक्कम १२७ कारखान्यांकडून वितरित

Sugarcane Season : राज्यातील साखर कारखान्यांनी चालू हंगामात शेतकऱ्यांकडून खरेदी केलेल्या उसाच्या मोबदल्यात रास्त व किफायतशीर दरापोटी (एफआरपी) १५ एप्रिलअखेर २६ हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा केले आहेत.
Sugarcane
Sugarcane Agrowon

Pune News : राज्यातील साखर कारखान्यांनी चालू हंगामात शेतकऱ्यांकडून खरेदी केलेल्या उसाच्या मोबदल्यात रास्त व किफायतशीर दरापोटी (एफआरपी) १५ एप्रिलअखेर २६ हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा केले आहेत. १२७ कारखान्यांनी अडचणींवर मात करीत शेतकऱ्यांना १०० टक्के एफआरपी दिली आहे.

Sugarcane
Sugarcane FRP : ‘एफआरपी’ थकविणारे कारखाने कारवाईच्या रडारवर

साखर आयुक्तालयाच्या सूत्रांनी सांगितले, की २०२३-२४ मधील गाळप हंगाम आता शेवटच्या टप्प्यात आहे. गाळपात यंदा २०७ साखर कारखान्यांनी भाग घेतला. १५ एप्रिलअखेर या कारखान्यांनी शेतकऱ्यांकडून एकूण १०६० लाख टनांहून अधिक उसाची खरेदी केली होती. खरेदीनंतर १४ दिवसांच्या आत एफआरपी द्यावी लागते.

अर्थात, तोडणी व वाहतूक खर्च वजा करून ‘एफआरपी’ शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केली जाते. त्यानुसार आतापर्यंत तोडणी व वाहतुकीसह एकूण ३२ हजार ८०३ कोटी रुपयांची एफआरपी अदा करणे अपेक्षित होते. तर तोडणी व वाहतूक खर्च वजा केल्यास २४ हजार ६६९ कोटी रुपये ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणे आवश्यक होते.

Sugarcane
Sugarcane FRP : ‘एफआरपी’ थकविणारे कारखाने कारवाईच्या रडारवर

‘‘एफआरपीपेक्षा जादा पेमेंट करणाऱ्या कारखान्यांच्या रकमा हिशेबात घेता आतापर्यंत तोडणी व वाहतुकीचा खर्च गृहीत धरीत एकूण ३४ हजार १७० कोटींची एफआरपी दिल्याचे कागदोपत्री दिसते. तोडणी, वाहतुकीचा खर्च वजा केल्यास शेतकऱ्यांना निव्वळ दिलेली रक्कम २६ हजार ३५ कोटी आहे,’’असे सूत्रांनी स्पष्ट केले.

‘थकित एफआरपी झपाट्याने कमी’

चालू हंगामात तोडणी व वाहतुकीसह एकूण देय एफआरपी व आतापर्यंत अदा केलेली रक्कम याचा ताळमेळ घातल्यास यंदा १५ एप्रिलपर्यंतची एफआरपीची थकबाकी १३८७ कोटींच्या आसपास दिसत होती.

अर्थात, हंगाम संपत येत असताना थकित एफआरपीचा आकडा झपाट्याने कमी होतो आहे. साखर आयुक्तांनी एफआरपी अदा करण्याबाबत सतत पाठपुरावा सुरू ठेवल्याचा हा परिणाम असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

११ कारखान्यांनी टाकले चिंतेत

चालू गाळप हंगामात १२७ कारखान्यांनी आतापर्यंत १०० टक्के एफआरपी दिली आहे. याउलट ८० साखर कारखान्यांना पेमेंट वाटपाचे नियोजन करता आलेले नाही. यातील ५२ कारखान्यांनी ८० टक्क्यांहून अधिक रक्कम दिली आहे. १७ कारखान्यांनी ६० टक्क्यांहून अधिक, तर ११ कारखान्यांनी ६० टक्क्यांच्या आत रक्कम देत शेतकऱ्यांना चिंतेत टाकले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com