Fuel Price
Fuel Price Agrowon

Fuel Rates : फेब्रुवारीत इंधन दरात कपात शक्य ; दहा रुपयांनी पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार

Fuel Price : सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांचा नफा वाढल्याच्या पार्श्‍वभूमीवर फेब्रुवारी महिन्यात पेट्रोल आणि डिझेलचे दर प्रति लिटरमागे दहा रुपयांनी कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Published on

Petrol Rate : सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांचा नफा वाढल्याच्या पार्श्‍वभूमीवर फेब्रुवारी महिन्यात पेट्रोल आणि डिझेलचे दर प्रति लिटरमागे दहा रुपयांनी कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून यासंदर्भात केंद्र सरकारकडून तेल कंपन्यांना निर्देश दिले जाऊ शकतात, असे समजते.

चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत तेल कंपन्यांना सुमारे ७५ हजार कोटी रुपयांचा नफा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जनतेला महागाईपासून दिलासा देण्यासाठी तेल कंपन्यांनी काही प्रमाणात इंधनाचे दर कमी करावेत, असा दबाव सरकारकडून तेल कंपन्यांवर टाकला जाऊ शकतो. गेल्या एप्रिल २०२२ पासून तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलचे दर ‘जैसे थे’ ठेवले आहेत.

Fuel Price
Fuel Price: राज्यात पेट्रोल ५ तर डिझेल ३ रुपयांनी स्वस्त

चालू महिन्याच्या अखेरीस तेल कंपन्यांकडून तिमाही निकाली जाहीर केले जाणार आहेत. मागील काही महिन्यांपासून जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे दर स्थिर असल्याने तेल कंपन्यांच्या नफ्याच्या मार्जिनमध्ये सातत्य आले आहे.

सप्टेंबर तिमाहीचा विचार केला तर हिंदुस्थान पेट्रोलियमला ५८२७ कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला होता. दुसरीकडे भारत पेट्रोलियमला ८२४४ कोटी रुपये तर इंडियन ऑईलला १२ हजार ९६७ कोटी रुपयांचा नफा झाला होता. तिन्ही कंपन्यांचा एकत्रित नफा २७ हजार ३८ कोटी रुपये होता.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com