Fruit Crop Insurance: नांदेडमधील दहा मंडलांना फळपीक विमा मंजूर

Rabi Season 2023-2024 : जिल्ह्यात रब्बी हंगाम २०२३-२०२४ मध्ये हवामान आधारित फळपीक विमा योजना राबविण्यात आली.
Fruit Crop
Fruit CropAgrowon
Published on
Updated on

Nanded News: जिल्ह्यात रब्बी हंगाम २०२३-२०२४ मध्ये हवामान आधारित फळपीक विमा योजना राबविण्यात आली. यात जिल्ह्यातील १८ महसूल मंडलांत केळी आणि आंबा या फळपिकांसाठी शेतकऱ्यांनी विमा भरला होता. परंतु यातील दहा मंडलांतील शेतकऱ्यांना आंबा आणि केळीसाठी विमा मंजूर झाला आहे.

तर सर्वाधिक केळीचे क्षेत्र असलेल्या बारड, मुगटसह आठ मंडलांना ट्रिगर लागू झाला नसल्यामुळे परतावा नामंजूर झाल्याची माहिती सूत्राने दिली आहे. आंबिया बहरामध्ये संत्रा, मोसंबी, काजू, डाळिंब, आंबा, केळी, द्राक्ष, स्ट्रॉबेरी, पपई या नऊ फळपिकांसाठी महसूल मंडलस्तरावर ही योजना राबविण्यात आली होती.

Fruit Crop
Fruit Crop Insurance : सांगलीतील अडीच हजारहून अधिक शेतकऱ्यांनी घेतला फळ पीकविमा

यात केळीसाठी अर्धापूर, दाभड, मालेगाव, भोसी, आष्टी, हदगाव, बोधडी, शेवडी (बा), बारड मुदखेड, मुगट, नाळेश्‍वर, नांदेड ग्रामीण, तरोडा व विष्णुपुरी या मंडलांचा समावेश होता. तर आंबा या फळपिकांसाठी मुक्रमाबाद व लिंबगाव या दोन मंडलांतील शेतकऱ्यांनी भारतीय विमा कंपनीकडे सहभाग घेतला. या कंपनीकडून नुकताच १० मंडलांना विमा परतावा मंजूर केला आहे. तर आठ मंडलांतील शेतकऱ्यांना उच्च तापमानाचे ट्रिगर लागू झाल्यामुळे विमा परतावा नामंजूर झाला आहे.

Fruit Crop
Fruit Crop Insurance : फळपीक विमा योजनेचे प्रस्ताव सादर करा

यात केळीसाठी पहिल्या टप्यांत अधिक तापमान या घटकानुसार अर्धापूर, दाभड, मालेगाव, भोसी, शेवडी बाजीराव, मुदखेड व विष्णुपुरी या मंडलांत हेक्टरी ३५ हजार रुपये परतावा मंजूर झाला आहे.

तर आंबा फळपिकासाठी फुलवळ, मुक्रमाबाद व लिंबगाव या मंडलासाठी हेक्टरी ३५ हजार रुपये विमा परतावा मंजूर झाला आहे. परंतु यात बारड, आष्टी, हदगाव, नाळेश्‍वर, नांदेड ग्रामीण, तरोडा, मुगट या महसूल मंडलांत उच्च तापमानाचा ट्रिगर लागू झाला नसल्यामुळे विमा परतावा नामंजूर झाला आहे.

बारड मंडलातील ३४३ शेतकऱ्यांनी केळीसाठी विमा भरला होता. मागील वर्षी उन्हाळ्यात तापमान ४५ अंश सेल्सिअसपर्यंत गेले होते. त्यामुळे केळीचे नुकसान झाले. परंतु सर्वाधिक सहभाग घेतलेल्या या मंडलात विमा कंपनीकडून दरवर्षी परतावा नाकारण्यात येत आहे. - नीलेश देशमुख, शेतकरी, बारड, ता. मुदखेड

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com