
Nashik News : नाशिक शहरात गेल्या नव्वदच्या दशकानंतर औद्योगीकरण मोठ्या प्रमाणात झाले आहे. राज्यातील प्रमुख औद्योगिक शहरांमध्ये नाशिक शहर महत्त्वाचे ठरले असून नाशिकच्या विकासात उद्योगांचे योगदान मोलाचे आहे, असे प्रतिपादन विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी केले.
राज्याच्या उद्योग संचालनालयातर्फे इन्व्हेस्टमेंट समिट नाशिक २०२५ चे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी डॉ. गेडाम बोलत होते. यावेळी ‘मैत्री’च्या समन्वय अधिकारी प्रियदर्शिनी सोनार, उद्योग विभागाच्या सह संचालक वृषाली सोने, नाशिक डाकघरचे प्रवर अधिक्षक प्रफुल्ल वाणी, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक संदीप पाटील, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी दीपक पाटील, भारतीय लघु उद्योग विकास बँकेचे सचिन सोनटक्के,‘निमा’चे अध्यक्ष ललित बूब, आयडीबीआय बँकेचे न्यू इंडिया इन्शुरन्सचे सहाय्यक व्यवस्थापक अनुप चव्हाण, ‘एमसीसीआयए’चे चेअरमन सी. एस. सिंग, इंजिनिअरिंग एक्स्पोर्ट प्रमोशन कांउन्सिलचे प्रादेशिक संचालक सी. एच. नादीगर यांच्यासह अधिकारी व उद्योजक उपस्थित होते.
डॉ. गेडाम म्हणाले, की नाशिकला व वायनरी उद्योग व पर्यटन क्षेत्रास अधिक संधी आहे. येणाऱ्या दोन वर्षात नाशिकच्या विकासाचा निश्चितच चालना मिळणार आहे. यात नाशिक ते पुणे व मुंबईपर्यंत जाणारा समृद्धी महामार्ग लवकरच सुरू होणार आहे. पुणे शहराच्या धर्तीवरच नाशिकलाही याचा लाभ होणार आहे. नाशिक येथे सुरू झालेल्या विमानतळामुळे विमानाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढली आहे. त्यामुळे विमानतळाचा विस्तार होणे गरजेचे आहे.
आगामी कुंभमेळाच्या दृष्टीने नाशिक शहरासाठी पायाभूत सुविधांसाठी अनेक प्रकल्प विचाराधीन आहेत. यात रस्ते, मेट्रोसह विविध प्रकल्पांचा समावेश आहे. उद्योगांचे लहान प्रश्नांचे स्थानिक पातळीवर निराकरण होणे गरजेचे असून मोठे धोरणात्मक प्रश्नांचा प्राधान्यक्रम ठरवून ते कसे सोडविण्याच्या दृष्टीने नियोजन उद्योग विभागाने करावे.
कुंभमेळ्याच्या दृष्टीने नाशिकचे ब्रँडिंग करण्याची मोठी संधी आहे. यामुळे उद्योगांना गुंतवणुकीस मोठे व्यासपीठ उपलब्ध होणार आहे.सर्व क्षेत्रातील उद्योगांनी आपली क्षमता ओळखून विकासाच्या दृष्टीने पाऊल टाकणे गरजेचे असून नाशिकचे नाव अग्रेसर करण्यात सर्वांनी प्रयत्नशील असले पाहिजे, असेही गेडाम यांनी सांगितले.
१४२ उद्योगांचे सामंजस्य करार
श्रीमती सोनार यांनी इज ऑफ डूईंग बिझनेस व मैत्री २.० ची सादरीकरणाद्वारे माहिती दिली. झालेल्या गुंतवणूक बैठकीत १४२ उद्योगांचे सामंजस्य करार झाले. यातून ६ हजार ४०४ कोटी रुपयांची गुंतवणूक झाली असून १४ हजार ४०३ रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.