Nursery Business : रोपवाटिका व्यवसायाने गाठला कोट्यवधींचा पल्ला

Agri Graduate Entrepreneur : सुरुवातीला छोटासा प्रयत्न म्हणून नर्सरी सुरू करणाऱ्या या व्यवसायाची वार्षिक उलाढाल आज कोट्यवधी रुपयांवर पोहोचली आहे.
Nursery Business
Nursery Business Agrowon
Published on
Updated on

Wardha News : एक छोटीशी सुरुवात मोठ्या परिवर्तनाचे निमित्त कशी ठरते याची प्रचिती ‘याची देही याची डोळा’ घ्यावयाची असेल तर उमरी (मेघे, ता. जि. वर्धा) येथील कृषी पदवीधर वैभव उघडे यांच्या मातोश्री नर्सरीला भेट द्यावी लागेल. सुरुवातीला छोटासा प्रयत्न म्हणून नर्सरी सुरू करणाऱ्या या व्यवसायाची वार्षिक उलाढाल आज कोट्यवधी रुपयांवर पोहोचली आहे.

रोपवाटिका व्यवसायच का निवडला याविषयी माहिती देताना वैभव सांगतो, की आमचे कुटुंबीय पपई लागवड करीत होते. त्या वेळी दर्जेदार पपई रोपांची उपलब्धता होत नव्हती. त्यामुळे बियाणे आणत स्वतः पपई रोपवाटिका तयार करण्याचा निर्णय घेतला. ही रोपे दर्जेदार मिळाली. त्याला स्थानिकस्तरावर ग्रामस्थांची देखील मागणी वाढली.

Nursery Business
Nursery Plant Sale : समाधानकारक पावसाने रोपवाटिकेमध्ये गर्दी

हाच नर्सरीकडे वळण्याचा आमच्यासाठी टर्निंग पॉइंट ठरला. त्यानंतर टप्प्याटप्प्याने प्रायोगिक तत्त्वांवर विविध पिकांची रोपे तयार करण्यावर भर देण्यात आला. ग्राहकांचा प्रतिसाद वाढू लागल्याने पुढे या व्यवसायाचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी लागणाऱ्या भांडवलाची सोय बॅंक ऑफ इंडियाकडून २५ लाख रुपयांच्या कर्जातून झाली. विशेष म्हणजे वैभव हा २०११ या वर्षांतील कृषी पदवीधर आहे.

...या रोपांची होते विक्री

शोभिवंत, फुलझाडे, फळझाडे तसेच भाजीपाल्याच्या सर्व रोपांची त्यांच्याद्वारे विक्री होते. त्याकरिता ७ पॉलिहाऊस आणि शेडनेट तीन याप्रमाणे संसाधने त्यांच्या प्रकल्पस्थळी आहेत.

Nursery Business
Vegetable Nursery : सातत्यपूर्ण पावसामुळे भाजीपाला रोपांना मागणी रोडावली

...अशी शोधली बाजारपेठ

आत्मा योजनेअंतर्गत ५५ पैसे प्रति नग याप्रमाणे रोपांचा पुरवठा करण्यात आला. निविदा कमी रकमेची भरण्यात आले. त्यामुळे तब्बल ११ लाख रोपांच्या पुरवठ्याचे कंत्राट मिळाले. या माध्यमातून शेतकरी व ग्राहकांप्रती पोहोचण्याचा प्रयत्न केला, असे वैभव सांगतात. वर्ध्यापासून दीड किलोमीटर अंतरावरच ही नर्सरी आहे. त्यामुळे शहरी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी शोभिवंत झाडांचे उत्पादन सुरू करण्यात आले.

भाजीपाला वांगी, टोमॅटो, मिरची, फुलकोबी, पत्ताकोबी, केळी, पपई, झेंडू याच्या रोपांना मागणी राहते. हंगामात ५० लाखांपेक्षा अधिक रोपांची विक्री होते. ८० पैसे ते १५ रुपयांपर्यंत या रोपांची किंमत राहते. विदर्भाबरोबरच पश्‍चिम महाराष्ट्र तसेच मध्य प्रदेशातील काही जिल्ह्यांमध्ये शोभिवंत झाडे तसेच रोपांचा पुरवठा होतो. त्या भागातील ग्राहकांकडून देखील वाढती मागणी असण्यामागे रोपांचा राखलेला दर्जा हे मुख्य कारण आहे. नर्सरीमध्ये देखील त्यांनी वैविध्य जपले आहे.

बारा एकरांवर मातोश्री नर्सरीचा विस्तार आहे. या क्षेत्रावरील रोपांच्या व्यवस्थापनकामी ४० मजुरांची नियुक्‍ती राहते. त्यांना वर्षभर या ठिकाणी रोजगार मिळतो. रोज सायंकाळी मजुरांची हजेरी घेत त्यांना आठवड्याच्या शेवटी वेतन देण्याची सोय आहे.
- वैभव उघडे मो. : ९९६०७६६६१४

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com