Nursery Plant Sale : समाधानकारक पावसाने रोपवाटिकेमध्ये गर्दी

Nursery Business : पावसाने चांगली हजेरी लावल्याने विविध वृक्षप्रेमी नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर आपल्या घर, बंगला अथवा परसबागेत फुले, फळझाडांसह शोभेच्या झाडांची मागणी वाढत आहे.
Nursery Business
Nursery BusinessAgrowon
Published on
Updated on

Palghar News : पावसाने चांगली हजेरी लावल्याने विविध वृक्षप्रेमी नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर आपल्या घर, बंगला अथवा परसबागेत फुले, फळझाडांसह शोभेच्या झाडांची मागणी वाढत आहे. त्यामुळे विक्रमगड परिसरातील नर्सरी, रस्त्याच्या कडेच्या रोपविक्रेत्यांकडे खरेदीसाठी गर्दी होत आहे.

अगदी कमी किंमत असलेल्या गुलमोहर म्हणजे ५० रुपयांपासून वडाच्या झाडांची म्हणजे २५० रुपयांपर्यंतच्या रोपांना मागणी वाढत असल्याचे नर्सरीचालक नवनीत हरड यांनी सांगितले. पावसाच्या पाण्यात अधिक प्रमाणात वृक्ष वाढीस लागणारे घटक अधिक असल्याने या काळात नागरिक वृक्ष, झाडे लावण्याकडे अधिक कल असतो.

शेतकरी वर्गदेखील आपल्या शेतात फुलशेती करण्यासाठी या दरम्यान झेंडू, गुलाब, मोगरा, सोनचाफा यासारख्या फुलांच्या रोपांची मागणी आहे. पावसामुळे विविध प्रकारचे वृक्ष व फुले-फळझाडे लावण्यासाठी नागरिक रोपे खरेदी करण्यासाठी गर्दी करीत आहेत.

Nursery Business
Onion Nursery Management : सुधारित तंत्राने कांदा रोपवाटिका

आयुर्वेदिक रोपट्यांना सर्वाधिक पसंती

पाली-विक्रमगड मार्गावरील ओंदे येथे असणाऱ्या नर्सरीत आयुर्वेदात औषधांचा उल्लेख असलेली विविध प्रकारची झाडे उपलब्ध आहेत. विक्रमगड परिसरात मुंबई, ठाणे, वसई परिसरातील फार्म मालक मोठ्या प्रमाणात वन औषधीची रोपे खरेदी करताना दिसत आहेत. आयुर्वेदावर विश्वास असणार्या वृक्षप्रेमींची या नर्सरीत पावले वळली आहेत. ही रोपे ९० ते ४०० रुपयापर्यंत उपलब्ध आहेत.

Nursery Business
Vegetable Nursery : सातत्यपूर्ण पावसामुळे भाजीपाला रोपांना मागणी रोडावली

फूलझाडे

गुलाब, मोगरा, जाई-जुई, चमेली, चाफा, रातराणीच्या राेपांची किंमत ९० पासून ३०० रुपयापर्यंत आहे.

सावली देणारी रोपटी

काशीद, रेन ट्री, वड, पिंपळ, बदाम, स्टेटोडीया, सिल्वर ओक १२० ते ८०० रुपयापर्यंत उपलब्ध आहेत.

बागेत लावण्याची झाडे

डायथन, आरेका पाल्म, टेबलपाम, हायकस १५० ते १२०० रुपयापर्यंत उपलब्ध आहेत.

फळझाडे

आंबा, पेरू, नारळ, डाळिंब, चिकू, सीताफळ, जांभूळ, फणस, काजू ९० ते ७०० रुपयापर्यंत उपलब्ध आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com