नाशिक जिल्ह्यातील पळसे (ता. नाशिक) येथील सागर गायखे कुटुंबाची केवळ एक एकर शेती आहे. तेवढ्या क्षेत्रातील पीकपद्धतीतून आर्थिक नफा वाढत नसल्याने कुटुंबाने पर्यायी पूरक उद्योगांचा शोध सुरू केला. नातेवाइकांच्या प्रेरणेतून तीन वर्षांपूर्वी रेशीम शेतीचा पर्याय मिळाला. तुती लागवडीसह कीटक संगोपन, कोषनिर्मितीपर्यंत उत्कृष्ट व्यवस्थापन करून हा उद्योग चांगल्या प्रकारे आकारास आणण्यास सुरुवात केली आहे. एक एकरच्या या पूरक व्यवसायाने अल्पभूधारक गायखे कुटुंबाचा संसार चांगल्या प्रकारे उभा राहिला आहे. .नाशिक जिल्ह्यातील पळसे (ता. नाशिक) येथील सागर गायखे कुटुंबाची अवघी एक एकर शेती आहे. वडील नंदकिशोर व चुलते शिवाजी प्रामुख्याने फ्लॉवर, कोबी टोमॅटो, वांगी व पालेभाज्यांचे उत्पादन घ्यायचे. शेतमालाच्या बाजारभावांतील अस्थिरता व मर्यादित उत्पन्नामुळे सातत्याने आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असे. नंदकिशोर यांचा मुलगा सागर यांना आर्थिक परिस्थिती व ओढाताणीमुळे दहावीनंतर शालेय शिक्षण घेता आले नाही. ते पूर्णवेळ शेतीच करू लागले. मात्र आर्थिक सक्षमता मिळविण्याच्या दृष्टीने ते सातत्याने अन्य पर्यायांचा शोध घेत होते. .Silk Farming: रेशीम बीजकोष निर्मितीत मिळवले प्रावीण्य.साडूंनी दाखवला मार्ग सागर यांचे साडू विनोद गायकवाड यांची विंचूर येथे रेशीम शेती आहे. त्यांनीच सागर यांना रेशीम शेतीचा मार्ग दाखवला. अन्य कोणत्याही पूरक व्यवसायांपेक्षा कमी भांडवलात हाच पर्याय सागर यांना सोईस्कर वाटला. त्यानुसार प्रयोगशील रेशीम उत्पादकांच्या भेटी घेऊन रेशीम शेतीचे कामकाज अभ्यासले. प्रत्यक्षात सुरुवात करताना भांडवल हा महत्त्वाचा मुद्दा समोर होता. कीटक संगोपन गृह.तुती लागवड व अन्य सुविधा मिळून सुमारे साडेपाच लाखांच्या गुंतवणुकीची गरज होती. त्यासाठी रेशीम विभागाकडून तीन लाख ३३ हजार रुपयांचे अनुदान मिळाले. बाकी स्वतःकडील बचतीचा वापर केला. आपले संपूर्ण म्हणजे एक एकरचे क्षेत्र तुती लागवडीसाठीच वापरले. सुरुवातीपासूनच प्रत्येक टप्प्यावर सर्व शास्त्रीय निकष पाळण्यांकडे लक्ष दिले. उद्योगाचा विस्तार करताना अनुभवी रेशीम उत्पादकांकडून कामकाजाचे तंत्र समजून घेतले. काटेकोर नियोजनाची जोड दिली. .Silk Farming: म्हसोबाची वाडी गाव वळाले रेशीम शेतीकडे.रेशीम शेतीतील ठळक बाबी सागर एका शेतकरी बचत गटाशी जोडले गेले आहेत. गटाच्या शेतकऱ्यांच्या शेतीमालाची थेट ग्राहकांना विक्री करण्याचे काम ते नाशिक येथे करतात. पणन मंडळाने त्यासाठी मदत केली आहे. दररोज आपल्या गावापासून नाशिकला पंधरा किलोमीटर ते येऊन जाऊन करतात. हा वेळ सांभाळून ते रेशीम शेती पाहतातच. परंतु पत्नी पूजा, आई लताबाई, वडील नंदकिशोर व चुलते शिवाजी असे कुटुंबातील अन्य सदस्य रेशीम शेतीत राबतात. त्यातून .कुटुंबातील सर्वांनी एकमेकांचा श्रमांचा भार हलका केला आहे. सुरुवातीच्या टप्प्यात गुणवत्तापूर्ण तुतीपाल्याची उपलब्धता करण्यात अडचणी होत्या. पाला कमी मिळत असे. परिणामी, कोषांची वाढ न झाल्याने वजन कमी व गुणवत्ताही कमी मिळायची. त्याचा दरांवर परिणाम व्हायचा. ही समस्या विचारात घेऊन पर्याय शोधले. पुढे योग्य वेळी छाटणी व अन्नद्रव्य व्यवस्थापन केले, फुटवे वाढल्याने पाला पुरेशा प्रमाणात उपलब्ध होऊ लागला..Silk Farming: रेशीम उद्योगात उझी माशीसह रोग नियंत्रणात यश.त्यामुळे कीटकांनाही चांगल्या प्रकारे पाला उपलब्ध होऊन कोष उत्पादनात सुधारणा होत गेली. तुती लागवडीत बैलजोडी किंवा छोट्या ट्रॅक्टरच्या माध्यमातून आंतरमशागत केली जाते. बांधाच्या बाजूला गिनी गवताची लागवड केली आहे. त्यामुळे शेजारील शेतकऱ्यांनी रासायनिक कीडनाशकांची फवारणी केल्यास त्याचे अंश तुतीवर पडणार नाही याची दक्षता घेतली जाते. पानांची तोडणी झाल्यानंतर चांगल्या फुटव्यांसाठी खरड छाटणीच्या कामात कटरचा वापर होतो. एकसारखी छाटणी करून घेतली जाते..व्यवस्थापनातील प्रमुख बाबीकीटक संगोपनगृहात लोखंडी अँगलचा वापर करून २० बाय ५ फूट अंतराचे चार रॅक्स.प्रत्येक रॅकला पाच मजले किंवा कप्पे. संगोपनगृहात आर्द्रता व तापमान नियंत्रणाकडे विशेष लक्ष.दर्जेदार तुतीच्या पाल्याचा दिवसातून दोन वेळेस पुरवठा.संसर्ग व रोग टाळण्यासाठी बेड कोरडे ठेवण्याकडे लक्ष,प्रत्येक बॅच आटोपल्यानंतर संगोपनगृहाचे निर्जंतुकीकरणतापमानात घट झाल्यास ऊब तयार केली जाते. तापमान वाढल्यास संगोपनगृहाच्या वरच्या बाजूला सूक्ष्म तुषार फवारे व बारदाने लावून ओलावा तयार केला जातो. .Silk Farming: रेशीम उद्योगाने दिले आर्थिक स्थैर्य....अशी झाली प्रगतीसागर सांगतात, की याच रेशीम शेतीतून फोर व्हीलर घेता आली. मुलगा अथर्वला इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकवता येत आहे. घरचे दैनंदिन खर्च याच रेशीम शेतीतून भागविणे शक्य होत आहे. कुटुंबाची आर्थिक घडी बसली आहे. चालूवर्षी मेपासून पाऊस आहे, शेतीमालाच्या दरात मोठी चढउतार आहे. मात्र रेशीम शेतीला तुलनेने कुठली अडचण आली नाही असे सागर सांगतात. मालाच्या गुणवत्तेनुसार दर मिळतात..भाजीपाला शेती सोडून रेशीम उद्योगात उतरल्यानंतर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले. कुणी नकारात्मकतेने त्याकडे पाहिले. आज मात्र कुटुंबाचे रेशीम शेतीतील काम पाहण्यासाठी अनेक जण आवर्जून भेट देण्यासाठी येतात. आतापर्यंत पाच शेतकऱ्यांनी प्रेरणेतून रेशीम शेती करण्यास सुरुवात देखील केली आहे. कुटुंबाच्या वाटचालीत जिल्हा रेशीम अधिकारी पी. व्ही. इंगळे यांच्यासह विनोद गायकवाड, संतोष भोर, नाना जाधव, चंद्रकांत जाधव या प्रगतशील रेशीम उत्पादक शेतकऱ्यांचे सातत्याने मार्गदर्शन मिळते. .उत्पादन, विक्री व्यवस्था प्रति बॅच सुमारे ४५ दिवसांची असते. वर्षभरात सुमारे पाच ते सहा बॅचेस घेतल्या जातात. प्रति २०० अंडीपुजांच्या बॅचमागे १७० ते १८० किलो कोषांचे उत्पादन मिळते. चॉकी उत्पादन सागर स्वतः करतात. सागर यांचे परिसरातील रेशीम उत्पादकांसोबत नेटवर्क आहे. सर्वांनी एकत्रपणे कोष बाजारपेठेत नेले तर ते आम्हाला फायदेशीर ठरते असे सागर सांगतात. बीड येथील बाजारपेठेत कोषांची विक्री होते. त्यास प्रति किलो ५०० ते ७०० रुपयांपर्यंत दर मिळतो. प्रति बॅच २० हजार रुपयांपर्यंत खर्च येतो. सागर गायखे ९७६२३१८८३६.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.