Anuskura Ghat : अणुस्कुरा घाटात वारंवार दरड कोसळण्याच्या घटना, जिल्हाधिकारी ॲक्शन मोडवर

Ratnagiri Collector : रत्नागिरी जिल्ह्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेत जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी सूचना करत घटनास्थळांची पाहणी केली.
Anuskura Ghat
Anuskura Ghatagrowon

Landslides Anuskura Ghat : कोल्हापूर जिल्ह्याला जोडणाऱ्या रत्नागिरी जिल्ह्यातील अणुस्कुरा घाटात मागच्या चार दिवसांपूर्वी दरड कोसळण्याची मोठी घटना घडली होती. दरम्यान अणुस्कुरा घाटात दरड कोसळण्याच्या वारंवार घटना घडत असल्याने सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. यावर रत्नागिरी जिल्ह्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेत जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी सूचना करत घटनास्थळांची पाहणी केली. अणुस्कुरा घाटात मागच्या वर्षीही दोनवेळा दरड कोसळण्याच्या घटना घडल्या होत्या.

नैसर्गिक आपत्तीकाळात सर्व प्रशासकीय यंत्रणांनी अधिक सतर्क राहावे, अशा सूचना जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी प्रशासनाला दिल्या. राजापूर तालुक्यातील आपत्ती व्यवस्थापनाचा आढावा घेण्यापूर्वी जिल्हाधिकारी यांनी अणुस्कुरा घाट दरड प्रवणक्षेत्र व अर्जुना धरण प्रकल्पाची पाहणी केली.

राजापूर प्रांताधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीला जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजारी, राजापूर प्रांताधिकारी वैशाली माने, उपविभागीय पोलिस अधिकारी यशवंत केडगे, तहसीलदार शीतल जाधव, लांजा तहसीलदार प्रमोद कदम, पोलिस निरीक्षक राजाराम चव्हाण, मुख्याधिकारी प्रशांत भोसले आदींसह सर्व विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

या प्रसंगी जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी आरोग्य, बांधकाम, कृषी, महसूल प्रशासकीय विभागांनी नैसर्गिक आपत्ती काळासाठी केलेल्या नियोजनाची माहिती घेतली. राजापूर तालुक्यात निर्माण होणाऱ्या नैसर्गिक आपत्तीसाठीच्या नियोजनाबाबतची माहिती प्रांताधिकारी वैशाली माने यांनी दिली.

राजापूर शहरातही कशाप्रकारे आपत्तीकाळात नियोजन करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. या वेळी तालुक्यातील दरडप्रवण क्षेत्र व तेथील परिस्थितीचाही त्यांनी आढावा घेतला. नैसर्गिक आपत्तीकाळात सर्व प्रशासकीय विभागांनी दक्ष राहावे, अशा सूचना जिल्हाधिकारी सिंह यांनी दिल्या.

बैठकीनंतर जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी अणुस्कुरा घाटामध्ये रस्त्यावर दरड कोसळलेल्या ठिकाणास भेट देऊन पाहणी केली व संबंधित यंत्रणांना योग्य त्या सूचना दिल्या तसेच अन्य धोकादायक ठिकाणांचीही पाहणी केली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com