
Solapur News : शाश्वत दुग्ध व्यवसायासाठी मुक्तसंचार गोठा पद्धत फायदेशीर आहेच, पण त्याशिवाय उत्कृष्ट कालवड निर्मितीवरही भर द्यावा लागेल, असे मत नागपूरच्या माफसूचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. अनिल भिकाने यांनी पंढरपूर येथे व्यक्त केले.
महाराष्ट्र पशू व मस्त्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर व भारतीय कृषी अनुसंधान परिषद, राष्ट्रीय मांस संशोधन संस्था, हैदराबाद यांचे संयुक्त विद्यमाने अनुसूचित जाती उपघटक योजने अंतर्गत क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय, शिरवळ (जि. सातारा) व पशुसंवर्धन खाते, सोलापूर यांचे संयुक्त विद्यमाने पंढरपुरात नुकतीच ‘‘शास्त्रोक्त दुग्धव्यवसाय व्यवस्थापन प्रशिक्षण’’ कार्यशाळा पार पडली.
त्या वेळी डॉ. भिकाने बोलत होते. हैदराबादच्या भारतीय कृषी संशोधन संस्थेचे संचालक डॉ. सुखदेव बारबुद्धे यांच्या हस्ते या कार्यशाळेचे उद्घाटन झाले. या वेळी प्रभारी सहयोगी अधिष्ठाता डॉ. विश्वास साळुंखे, सोलापूरचे पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. विजय येवले, डॉ. बसव रेड्डी, डॉ. योगेश गाडेकर, डॉ. विश्वास मोरे, सहायक आयुक्त डॉ. विलास डोईफोडे, प्रकल्प समन्वयक डॉ. गोकूळ सोनवणे उपस्थित होते.
डॉ. भिकाने म्हणाले, की दुष्काळी भागात दुग्ध व्यवसाय हे उपजीविकेचे एक मुख्य साधन असून, पशुपालक आणि युवकांनी दुग्धव्यवसायातून अधिक उत्पन्न मिळवण्यासाठी तसेच दुग्धव्यवसाय फायदेशीर करणेसाठी नवतंत्रज्ञानाचा स्वीकार करून शास्त्रोक्त पद्धतीने आहार व्यवस्थापन, मुक्त सचांर गोठा पद्धत आणि उत्कृष्ट कालवड निर्मिती या त्रिसूत्रीचा अवलंब करावा, असे सांगितले.
जनावरांसाठी मुक्त संचार गोठा पद्धतीत मनुष्यबळाची गरज कमी होऊन एकंदरीत जनावर आरोग्यदायी व आनंददायी राहिल्याने दूध उत्पादनात वाढ होत असल्याचेही ते म्हणाले.डॉ. गोकूळ सोनवणे यांनी प्रास्ताविक केले. डॉ प्रशांत म्हसे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. चंद्रशेखर मोटे यांनी आभार मानले.
तांत्रिक सत्रे, शेतकऱ्यांचा सत्कार
सोलापूर जिल्ह्यातील प्रगतिशील पशुपालक समाधान पवार, हनमंत सुरवसे, ज्योतिराम आवताडे यांचा या वेळी सत्कार करण्यात आला. तांत्रिक सत्रात डॉ. विश्वास साळुंके यांनी देशी गोवंश संगोपन याविषयावर, डॉ. प्रशांत म्हसे यांनी दुधाळ जनावरांतील स्तनदाह प्रतिबंध तसेच रेबीज जनजागृती यावर विशेष मार्गदर्शन केले. डॉ. दीपाली सकुंडे यांनी स्वच्छ दूधनिर्मिती तसेच दुधाचे आहारातील महत्त्व या विषयावर मार्गदर्शन केले. तसेच शास्त्रोक्त दुग्ध व्यवसाय व्यवस्थापन या माहिती पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.