Agriculture Department
Agriculture Departmentagrowon

Agriculture Department : खते, बियाणांबाबत फसवणूक होतेय इथे करा व्हॉट्‌सॲप, कृषी विभागाचा नवा उपक्रम

Solapur Rain : मृग नक्षत्राच्या सुरवातीला जिल्हाभरात चांगला पाऊस झाल्याने पेरणीयोग्य ओल झाली आहे.
Published on

Agriculture Department Solapur : सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची खते, बियाणे, औषधे खरेदीत फसवणूक होऊ नये म्हणून कृषी अधीक्षकांनी १३ भरारी पथके नेमली आहेत. त्यांच्यामार्फत मुदतबाह्य खते-औषधे व बियाणे विक्री होणार नाही, ज्यादा दराने त्याची विक्री, खतासोबत लिंकिंगचा आग्रह, खते असूनही नाहीत म्हणून शेतकऱ्यांना परत पाठविणे, अशा बाबींवर लक्ष ठेवले जाणार आहे.

मृग नक्षत्राच्या सुरवातीला जिल्हाभरात चांगला पाऊस झाल्याने पेरणीयोग्य ओल झाली आहे. यंदा जिल्ह्यात चार लाख हेक्टरवर खरीपाची पेरणी होईल, असा अंदाज आहे. सोयाबीन, उडीद पेरणी सध्या सुरू झाली आहे. शेतकरी पेरणीसाठी बियाणे, खते खरेदी करीत आहेत. पण, मागील अनुभव पहाता शेतकऱ्यांची खते- बियाणे खरेदीत फसवणूक होण्याची शक्यता आहे.

दुष्काळाच्या संकटाचा सामना करून खरीप पिकांवर आशादायी असलेल्या शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही, यासाठी विशेष लक्ष दिले जात आहे. या भरारी पथकांच्या माध्यमातून जिल्ह्यातील विविध कृषी सेवा केंद्रांना अचानक भेटी देऊन त्यांच्याकडील खते-बियाणे व औषध साठ्यांची तपासणी केली जाणार आहे. विक्रेत्यांकडील ऑनलाइन खरेदी-विक्री व दुकानांमधील साठा, यात तफावत आढळल्यास संबंधिताचा परवाना निलंबीत किंवा कायमचा रद्द होवू शकतो, असा इशारा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गवसाने यांनी दिला आहे.

शेतकऱ्यांनी पावती व थोडे बियाणे जपून ठेवावेत

जिल्ह्यातील शेतकऱ्यांची खते, बियाणे व औषधे खरेदी करतेवेळी फसवणूक होवू नये, त्यांना खते घेताना कोणीही लिंकिंग खतांचा आग्रह करू नये, दुकानात खते असतानाही नाहीत म्हणून सांगणे, खते ज्यादा दराने विक्री करणे, मुदतबाह्य खते विक्री करणे असे प्रकार होवू नयेत म्हणून यंदा १३ भरारी पथके नेमली आहेत.

Agriculture Department
Monsoon Rain : राज्यात पावसाचा जोर कधीपासून ? माॅन्सूनचा प्रवास कशामुळे थबकला? आठवड्याचा पावसाचा अंदाज काय?

शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी केल्यावर पावती घ्यावी, काही बियाणे राखून ठेवावे, पिशवी खालून फोडावी, जेणेकरून त्यांना बियाणात फसवणूक झाल्यास दाद मागता येईल, असेही कृषी अधीक्षक श्री. गवसाने यांनी सांगितले. शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या खते-बियाणे विक्रेत्यांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे.

शेतकऱ्यांनी ‘हा’ क्रमांक जपून ठेवावा

शेतकऱ्यांच्या तक्रारींचे निरसन करण्यासाठी प्रत्येक तालुक्यात तक्रार निवारण कक्ष सुरू करण्यात आला आहे. याशिवाय शेतकऱ्यांना तक्रारी करण्यासाठी ७२१९२८६९२८ हा व्हॉट्‌सॲप क्रमांक देण्यात आला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com