Fraud With Farmer : बियाणे कंपन्यांकडून शेतकऱ्यांची फसवणूक

Bogus Seeds : अधिकृत कंपनी समजून शेतकरी ठरलेली बियाण्यांची किंमत मोजूनही इगतपुरी-त्र्यंबकेश्वर भागात भात बियाणे कंपन्यांनी भेसळयुक्त बियाणे विकून शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान केले आहे.
Soybean Seeds
Soybean SeedsAgrowon
Published on
Updated on

Nashik News : अधिक उत्पन्न घेण्यासाठी शेतकरी सुधारित बियाण्यांची खरेदी करतात. अधिकृत कंपनी समजून शेतकरी ठरलेली बियाण्यांची किंमत मोजूनही इगतपुरी-त्र्यंबकेश्वर भागात भात बियाणे कंपन्यांनी भेसळयुक्त बियाणे विकून शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान केले आहे, अशा आशयाचे निवेदन आमदार हिरामण खोसकर यांनी जिल्हाधिकारी जलज शर्मा यांना दिले.

काही बोगस बियाणे व कंपन्यांच्या कामकाजामुळे शेतकरी अडचणीत आहेत. बोरटेंभी येथील बाळू नवले यांच्या अडीच एकर क्षेत्रात भाताऐवजी कुसळे आल्याने एकरी वीस ते २५ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. त्र्यंबकेश्वर येथे असेच प्रकार समोर आले आहेत. तालुका कृषी विभागात याबाबत शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या आहेत.

('ॲग्रोवन'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आदिवासी मतदार संघात दर वर्षी प्रत्येक हंगामात भात बियाणे भेसळ निघण्याचे प्रमाण अधिक आहे. ज्या नियमात राहून साचेबंद धोरणाने बियाणे तयार करावे लागतात, ती प्रक्रिया काहीतरी कारणाने चुकून भेसळ बियाणे विक्रीला येतात. बियाणे विक्रीला येण्यापूर्वी बियाण्यांची कृषी विभागाने काळजी घेणे गरजेचे आहे.

Soybean Seeds
Rabi Season : परभणी कृषी विद्यापीठाचे ३६४ क्विंटल बियाणे विक्री रब्बीतील ज्वारी, हरभरा, गहू बियाण्यांचा समावेश

आवश्यक चाचण्यांची पूर्तता करून नंतरच ते विक्रीला आणणे आवश्यक असते. मात्र, अधिक नफ्यासाठी खासगी व्यापारी, कंपन्या नियमांना तिलांजली देत भेसळ बियाणे विकत असल्याचे समोर आले असून, त्याकडे कृषी विभागाचे दुर्लक्ष होत आहे. नामवंत कंपन्यांनी भेसळ बियाणे विकून शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे.

Soybean Seeds
Seed Act : बियाणेविक्रीत शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठीच कायद्यात सुधारणा

कधी अधिक कालावधीचे बियाणे कमी दिवसांत येते, तर कधी कमी दिवसांचे बियाणे अधिक दिवस घेते, अशा प्रकारांमुळे शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागते. दरवर्षीच शेतकऱ्यांना अशा संकटाचा सामना करावा लागतो, असेही निवेदनात म्हटले आहे. जिल्हा कृषी अधीक्षक, प्रांतधिकारी व इगतपुरी-त्र्यंबकेश्वर तालुका कृषी अधिकाऱ्यांना निवेदनाच्या प्रती देण्यात आल्या आहेत.

शेतकऱ्यांना थेट कंपनी मालकाकडून नुकसानभरपाई मिळणे अपेक्षित आहे. कोर्ट-कचेऱ्यांची येरझार नको. कोर्टात जावे लागले, तर ग्राहक मंचाचा खर्चही कंपनीने द्यावा. कृषी विभागाने तसा पाठपुरावा करावा. वारंवार भेसळयुक्त बियाणे कंपनी पुरवत असल्यास तिच्यावर प्रतिबंध लावावा.
हिरामण खोसकर, आमदार-इगतपुरी-त्र्यंबकेश्वर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com