Seed Act : बियाणेविक्रीत शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठीच कायद्यात सुधारणा

Dhananjay Munde : शेतकऱ्यांना भेसळयुक्त बियाणांची विक्री होते, तशा तक्रारी सातत्याने येत असतात. शेतकऱ्यांची ही फसवणूक होऊ नये, या साठीच राज्य सरकार सध्याच्या कायद्यांमध्ये सुधारणा करत आहे,
Dhananjay Munde
Dhananjay MundeAgrowon

Solapur News : शेतकऱ्यांना भेसळयुक्त बियाणांची विक्री होते, तशा तक्रारी सातत्याने येत असतात. शेतकऱ्यांची ही फसवणूक होऊ नये, या साठीच राज्य सरकार सध्याच्या कायद्यांमध्ये सुधारणा करत आहे, त्यासाठी संबंधित समितीच्या दोन बैठकाही पार पडल्या आहेत. त्यामुळे हा नवा कायदा झाल्यानंतर शेतकऱ्यांची फसवणूक निश्चित टळेल, असे राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी शुक्रवारी (ता. ६) येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले.

पंढरपुरात शुक्रवारी (ता. ६) कृषी निविष्ठा विक्रेत्यांचा मेळावा आयोजिण्यात आला होता. त्यावेळी मंत्री मुंडे यांनी पत्रकारांशी वार्तालाप केला. मंत्री मुंडे म्हणाले, सरकारकडून शेतकऱ्यांच्या फसवणुकीच्या अशा तक्रारींची गंभीर दखल घेतली जात आहे. त्यासाठीच कायद्यातील बदल सुचवले जात आहेत. पण त्यात सर्वांची मतेही जाणून घेतली जात आहेत.

Dhananjay Munde
Dhananjay Munde : ८ दिवसात नुकसान भरपाई न दिल्यास पीक विमा कंपन्यांवर कारवाई, कृषीमंत्र्यांचा इशारा

कायदा सुधार समितीच्या दोन बैठका झाल्या आहेत. आता यावर किरकोळ कृषी विक्रेते, ठोक विक्रेते किंवा निविष्ठा तयार करणाऱ्या कंपन्या या सर्वांना त्यांची मते, म्हणणे मांडण्यासाठी एक महिन्याची मुदत देण्यात आली आहे.

सरकार कोणाच्याही विरोधात नाही, पण एवढे मात्र नक्की, या कायद्यानंतर कोणीही शेतकऱ्यांची फसवणूक करू शकणार नाही, असेही मुंडे म्हणाले. तत्पूर्वी मंत्री मुंडे यांनी सकाळी महुद (सांगोला) आणि सोनके (पंढरपूर) येथील काही शेतकऱ्यांच्या शेतावर पिकांची पाहणी केली.

Dhananjay Munde
Dhananjay munde : कोणाची मागणी नव्हती म्हणून... सोयाबीन संशोधन केंद्रावर धनंजय मुंडेंचं स्पष्टीकरण

बोगस मका बियाणाबाबत शेतकऱ्याची तक्रार

पंढरपुरातील या मेळाव्यादरम्यान खर्डी (ता. पंढरपूर) येथील मोहन जाधव हे शेतकरी हातात मक्याची पेंढी घेऊन याठिकाणी आले होते. त्यांच्या मक्याला कणसेच लागली नाहीत, अशी त्यांची तक्रार होती.

आज ७० दिवसांची मका आहे, पण एकही कणीस नाही, संबंधित कंपनीकडे, कृषी विभागाकडे तक्रार केली, पण कोणीच दखल घेत नाही, मला न्याय द्या म्हणत त्यांनी ही पेंढी मंत्री मुंडे यांना देण्याचा प्रयत्न केला. पण त्यांचे निवेदन आणि म्हणणे ऐकून घेऊन मंत्री मुंडे काहीच उत्तर न देता निघून गेले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com