Farm Ponds : वर्षभरात उभारली चौदा हजार शेततळी

Agriculture Department : कृषी विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या ‘मागेल त्याला शेततळे’ (मुख्यमंत्री शाश्‍वत सिंचन योजना) योजनेतून राज्यात गेल्या वर्षात वैयक्तिक १३ हजार ५०० शेततळ्यांचे उद्दिष्ट निश्‍चित केले होते. मात्र उद्दिष्टाहून अधिक १४ हजार २२ शेततळी तयार झाली आहेत.
Farm Pond
Farm PondAgrowon
Published on
Updated on

Nagar News : कृषी विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या ‘मागेल त्याला शेततळे’ (मुख्यमंत्री शाश्‍वत सिंचन योजना) योजनेतून राज्यात गेल्या वर्षात वैयक्तिक १३ हजार ५०० शेततळ्यांचे उद्दिष्ट निश्‍चित केले होते. मात्र उद्दिष्टाहून अधिक १४ हजार २२ शेततळी तयार झाली आहेत. त्यात एकट्या नगर जिल्ह्याने ३१८९ शेततळे केली आहेत. त्यापाठोपाठ नाशिक, सोलापूर, सांगली, सोलापूरही शेततळी करण्यावर आघाडीवर आहे.

राज्य शासनाच्या कृषी विभागाच्या प्रमुख योजनांचा शेतकऱ्यांना अनुदानावर लाभ दिला जातो. दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी वैयक्तिक शेततळे करण्यावर शेतकऱ्यांचा भर आहे. राज्यात २०२३-२४ या वर्षात कृषी विभागाने १३ हजार ५०० वैयक्तिक शेततळे करण्याचे उद्दिष्ट दिले होते. ‘महाडीबीटी’मार्फत तब्बल २ लाख १४ हजार ९४३ शेतकऱ्यांनी अर्ज केले आणि त्यांची सोडतीतून वैयक्तिक शेततळ्याचा लाभ देण्यासाठी निवड झाली.

Farm Pond
Farm Pond : ‘मागेल त्याला शेततळे’तून सांगलीत १२३७ तळी

मात्र २४४८ अर्ज शासनाने बाद केले, तर १ लाख ६३ हजार ४०८ शेतकऱ्यांनी वेळेत कागदपत्रे दिली नाहीत, शेततळी करण्याला नकार दिल्याने शासनाला रद्द करावी लागली. ४९ हजार ८७ शेतकऱ्यांना शेततळी देण्यासंदर्भात प्रक्रिया सुरू झाली. त्यातही ३३ हजार ९३४ शेतकऱ्यांनी प्रक्रिया पूर्ण केली आणि १४ हजार ०२२ शेतकऱ्यांनी मार्च २०२४ अखेर कामे पूर्ण करून अनुदानास पात्र ठरले आहेत. १३ हजार ४६ शेतकऱ्यांना आतापर्यंत अनुदानाची रक्कम मिळाली आहे.

एकशे सहा कोटींचे वितरण

राज्यात वर्षभरात (२०२३-२४) साधारणपणे १३ हजार ५०० वैयक्तिक शेततळे करण्याचे उद्दिष्ट निश्‍चित करून, त्यासाठी १०० कोटी रुपयांचे अनुदान वितरित करण्याचे उद्दिष्ट होते. प्रत्यक्षात मात्र १०६ कोटी रुपये वितरित झाले आहेत. वैयक्तिक शेततळे करण्यात अव्वल असलेल्या नगर जिल्ह्यात ४९ कोटी रुपये अनुदानापोटी खर्च केले आहेत.

Farm Pond
Farm Pond : ‘शेतकऱ्यांसाठी शेततळे ठरतेय उन्हाळ्यातील वॉटर बँक’
‘महाडीबीटी’ प्रणाली ही पेपरलेस असून, पारदर्शकपणे लाभार्थी निवड होते. संगणकीकृत प्रणालीद्वारे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर थेट अनुदान वितरित होत आहे. नगर जिल्ह्यात मागेल त्याला शेततळे योजनेला मोठा प्रतिसाद मिळत असून कृषी विभागाकडून मागणीनंतर तातडीने लाभ देण्यासाठी प्रयत्न केले जात आहे.
सुधाकर बोराळे,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, नगर

जिल्हानिहाय झालेली शेततळी (कंसात उद्दिष्ट)

ठाणे : ८६ (१२५), पालघर : ८५ (१२०), रायगड : ९८ (२१०), रत्नागिरी : ५४ (२१०), सिंधुदुर्ग : २२ (१९०), नाशिक : २२१९ (६०५), धुळे : १५४ (२६०), जळगाव : २३६ (५९०), नंदुरबार : ९२ (१६५), नगर : ३१८९ (९३०), पुणे : ९१८ (६००), सोलापूर : १५५७ (६९०), सातारा : २४८ (६००), सांगली : १३२८ (४७५), कोल्हापूर : १६८ (४८०), छत्रपती संभाजीनगर : ७२९ (६४०), जालना : ७३५ (४७०), बीड : १९९ (६३०), लातूर : १०६ (३९५), धाराशिव : २०० (३९०), नांदेड : ९२ (५७०), परभणी : ११० (४२०), हिंगोली : ४९ (२८०), बुलडाणा : १७३ (५००) अकोला : ९६ (३४०), ६९ वाशीम : ४१ (२५५), अमरावती : ७४ (५००), यवतमाळ : १७ (५००), वर्धा : १७ (२२०), नागपूर : ४० (३२५), भंडारा : ३९ (१८०), गोंदिया : १२२ (१८५), चंद्रपूर : ५५ (३१०), गडचिरोली : ६८८ (१४०).

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com