Farm Pond : ‘मागेल त्याला शेततळे’तून सांगलीत १२३७ तळी

Water Ponds : सांगली जिल्ह्यात ‘मागेल त्याला शेततळे’ योजनेस मोठा प्रतिसाद मिळाला. गत आर्थिक वर्षात १२३७ शेततळी पूर्ण झाली.
Farm Pond
Farm PondAgrowon
Published on
Updated on

Sangli News : सांगली जिल्ह्यात ‘मागेल त्याला शेततळे’ योजनेस मोठा प्रतिसाद मिळाला. गत आर्थिक वर्षात १२३७ शेततळी पूर्ण झाली. जिल्ह्यातील १ हजार २८० शेतकऱ्यांना यासाठी ७ कोटी ८३ लाख ५१ हजारांचे अनुदान वाटप झाले आहे. १०६ शेततळ्यांना अनुदान देण्याची प्रक्रिया सुरू आहे, अशी माहिती कृषी विभागाने दिली.

जिल्हा कृषी विभागाने मागेल त्याला शेततळे या योजनेचा लाभ घेण्यासाठी जिल्हाभर प्रचार आणि प्रसिद्धी केली आहे. ही योजना प्रभावीपणे राबवली आहे. त्यामुळे गत आर्थिक वर्षात या योजनेतून १ हजार २८० शेतकऱ्यांनी १२३७ शेततळी पूर्ण केली आहेत. जिल्ह्यातील आटपाडी, तासगाव, कवठेमहांकाळ, मिरज, खानापूर आणि जत तालुक्यातील शेतकरी शेततळी योजनेचा लाभ घेण्यासाठी पुढाकार घेत आहेत.

Farm Pond
Farm Pond Scheme : नंबर लागूनही ३० हजार शेतकऱ्यांनी नाकारली शेततळी

त्यामुळे दुष्काळी भागात शेततळी शेतकऱ्यांना वरदान ठरत आहेत. जास्तीत जास्त ३० बाय ३० बाय ३ मीटर व कमीत कमी १५ बाय १५ बाय ३ मीटर आकारमानाचे यंत्राच्या साह्याने शेततळ्यांची खोदाई करून घोटणी केली जाते. पाण्याचा अपव्यय होऊ नये म्हणून अस्तरीकरणासाठी चांगल्या दर्जाचा प्लॅस्टिक कागद वापरला जातो.

Farm Pond
Farm Pond : ‘शेतकऱ्यांसाठी शेततळे ठरतेय उन्हाळ्यातील वॉटर बँक’

दृष्टिक्षेपात आकडे

वर्ष शेततळे संख्या अनुदानाची रक्कम

२०२२-२३ ६७ ३५.८३ लाख

२०२३-२४ १२३७ ७ कोटी ६३ लाख

अनुदान रक्कम :

शेततळ्याच्या आकारमानानुसार अनुदान रक्कम रुपये ७५ हजार ते १८ हजार ६२१ यानुसार मिळते. या योजनेत शेततळे अस्तरीकरणासह देखील लाभ मिळतो. त्यास १५ हजार रुपये ते ७५ हजार रुपये मिळते.

गतवर्षी जिल्ह्यात पाऊस कमी झाला आहे, ते पाणी पुरवून शेतीला वापरणे याशिवाय पर्याय नव्हता. त्याचबरोबर ओलिताखाली क्षेत्र वाढत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी या योजनेसाठी मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल केले आहेत. ज्या शेतकरी बांधवांना लाभ घ्यायचा आहे, त्यांनी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज दाखल करावेत.
विवेक कुंभार, जिल्हा कृषी अधीक्षक

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com