Grampanchayat Tax : ग्रामपंचायत कर न भरल्यावरून सरपंचासह चार सदस्य अपात्र

Payment of Tax : ग्रामस्थांना कराचा भरणा करण्याची नोटीस बजावणाऱ्यांनी मात्र स्वतःच कराचा भरणा केला नाही. त्यामुळे सरपंचासह चौघांवर अपात्रतेची वेळ आल्याचे धक्‍कादायक प्रकरण समोर आले आहे.
Grampanchayat Tax
Grampanchayat TaxAgrowon
Published on
Updated on

Yavatmal News : ग्रामस्थांना कराचा भरणा करण्याची नोटीस बजावणाऱ्यांनी मात्र स्वतःच कराचा भरणा केला नाही. त्यामुळे सरपंचासह चौघांवर अपात्रतेची वेळ आल्याचे धक्‍कादायक प्रकरण समोर आले आहे. ग्रामस्थांच्या तक्रारीवरून जिल्हाधिकाऱ्यांनी ही अपात्रतेची कारवाई केली.

राळेगाव तालुक्‍यातील खैरीच्या ग्रामपंचायत सरपंच किरण तृशांत महाजन, सदस्य पुष्पा गजानन इंगोले, उमेश अंबादास भारशंकर, मारोती बाबाराव दंडाजे यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. खैरी येथील ग्रामस्थ गणेश चिडे यांनी अपर जिल्हाधिकारी यांच्याकडे सदस्यत्व रद्द करण्याची मागणी केली होती.

('ॲग्रोवन'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Grampanchayat Tax
Crop Production : कमी पावसाचा पीक उत्पादनाला फटका

त्यासंदर्भातील याचिकेद्वारे दाखल करण्यात आली. या प्रकरणात ॲड. जयंत ठाकरे यांनी याचिकाकर्त्यांची बाजू मांडली. अपर जिल्हाधिकाऱ्यांनी एकंदरीत परिस्थित, पुरावे यांच्याआधारे सदस्यांना अपात्र घोषित केले. या प्रकरणामुळे सर्वदूर खळबळ उडाली आहे.

Grampanchayat Tax
Rajaram Sugar Factory : महादेवराव महाडिक यांच्याकडून 'राजाराम'ची एफआरपी जाहीर, परंतु दुसऱ्या हफ्त्यावर मौन

अपर जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणात ग्रामसेवक खैरी यांच्याकडून देखील अहवाल मागविला होता. त्यामध्ये संबंधित सरपंच व सदस्यांनी कराचा भरणा केला नसल्याची बाब पुढे आली. ग्रामपंचायत कराचा भरणा करण्यासंबंधी ग्रामस्थांना नोटीस बजावण्यात आल्या होत्या.

त्याचवेळी सरपंच व काही सदस्यांनी मात्र कराचा भरणाच केला नसल्याची माहिती समोर आली. त्यामुळे त्यांच्या विरोधात महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९ चे कलम १४ अनुसार याचिका दाखल करण्यात आली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com