Farmer Accident : सव्वा वर्षात चारशे शेतकरी अपघाताच्या घटना

Gopinath Munde Farmer Accident Scheme : नांदेड जिल्ह्यात मागील सव्वा महिन्यात ४०९ शेतकरी अपघाताच्या घटना घडल्या आहेत. यात अपघातग्रस्तांच्या वारसांनी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रस्ताव दाखल झाले आहेत.
Gopinath Munde Farmer Accident Scheme
Gopinath Munde Farmer Accident Scheme Agrowon
Published on
Updated on

Nanded News : नांदेड जिल्ह्यात मागील सव्वा महिन्यात ४०९ शेतकरी अपघाताच्या घटना घडल्या आहेत. यात अपघातग्रस्तांच्या वारसांनी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रस्ताव दाखल झाले आहेत.

यात खंडित कालावधीत २८३, तर योजना सुरू झाल्यापासून आजपर्यंत १२६ असे एकूण ४०९ प्रस्ताव दाखल झाले आहेत. यातील १२६ प्रस्ताव मंजूर झाले आहेत. तर आठ प्रस्ताव नामंजूर झाले आहेत. कागदपत्राच्या पूर्ततेसाठी ४५ प्रस्ताव पेंडिंग असल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्राने दिली

Gopinath Munde Farmer Accident Scheme
Farmer Accident Insurance : शेतकऱ्यांच्या वारसांना पाच महिन्यांत एक कोटीचे वितरण

अनेक वेळा शेतकऱ्यांना विविध कारणांनी आपला जीव गमवावा लागतो. यात अपघात, वीज पडणे, पूर, सर्पदंश, विंचू दंश, विजेचा धक्का बसणे आदी नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे अपघात, रस्त्यावरील अपघात, वाहन अपघात, तसेच अन्य कोणत्याही कारणामुळे होणारे अपघात, यामुळे अनेक शेतकऱ्यांचा मृत्यू होतो.

अशा अपघातग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबास आर्थिक लाभ देण्याकरिता राज्य शासनाने ता. १९ एप्रिल २०२३ रोजी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना सुरू केली. त्यापूर्वी सुरू असलेली गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेचा कालावधी सहा एप्रिल २०२२ रोजी संपली. यानंतर सात एप्रिल २०२२ ते २२ ऑगस्ट २०२२ या कालावधीत १२६ घटना घडल्या.

Gopinath Munde Farmer Accident Scheme
Gopinath Munde Farmer Scheme : गोपीनाथ मुंडे शेतकरी सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना काय आहे?

तर २३ ऑगस्ट २०२२ ते १८ एप्रिल २०२३ या खंडीत कालावधीत १५१ घटना अशा एकूण २९३ घटना घडल्या आहेत. यातील ५१ प्रस्ताव मंजूर झाल्यामुळे यातील मयतांच्या वारसांना कोटी ३० लाखांचे अनुदान देण्यात आले. तर शासनाने योजना सूरु केलेल्या १९ एप्रिल २०२३ पासून आजपर्यंत जिल्ह्यात १२६ घटनांचे प्रस्ताव अनुदानांसाठी दाखल झाले आहेत.

यातील ७२ प्रस्ताव मंजूर झाले आहेत. आठ प्रस्ताव नामंजूर तर ४५ प्रकरणात कागदपत्रांच्या पूर्ततेअभावी पेंडीग असल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्राने दिली.

असे मिळणार दोन लाखांचे सानुग्रह अनुदान

या योजनेत अपघातात मृत्यू झाल्यास दोन लाख रुपये नुकसान भरपाईची रक्कम निश्‍चित केली आहे. अपघातामुळे दोन डोळे अथवा दोन हात किंवा दोन पाय निकामी झाल्यास दोन लाख रुपये, अपघातामुळे एक डोळा व एक हात किंवा एक पाय निकामी झाल्यास दोन लाख रुपये, तर अपघातामुळे एक डोळा अथवा एक हात किंवा एक पाय निकामी झाल्यास एक लाख रुपये अनुदान दिले जाणार आहे. शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेचा लाभ मिळण्यासाठी आपग्रस्ताचे वय दहा ते ७५ वर्षे निश्‍चित केली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com