Mahavitaran Employee Scam : महावितरणचे चार कर्मचारी अटकेत

Mahavitaran Staff Arrested : नागरिकांच्या घरी जाऊन विजेचे मीटर पाहिल्यानंतर मीटर खराब असून, त्यातून तुम्ही वीजचोरी करीत असल्याचा धाक दाखवून हजारो रुपये उकळणाऱ्या वीज वितरण कंपनीच्या चार कर्मचाऱ्यांना नागरिकांनी एमआयडीसी पोलिसांच्या स्वाधीन केले.
Mahavitaran
MahavitaranAgrowon

Nagpur News : नागरिकांच्या घरी जाऊन विजेचे मीटर पाहिल्यानंतर मीटर खराब असून, त्यातून तुम्ही वीजचोरी करीत असल्याचा धाक दाखवून हजारो रुपये उकळणाऱ्या वीज वितरण कंपनीच्या चार कर्मचाऱ्यांना नागरिकांनी एमआयडीसी पोलिसांच्या स्वाधीन केले. यात उपकार्यकारी अभियंता व वरिष्ठ तंत्रज्ञाचा समावेश आहे. हा प्रकार एमआयडीसी परिसरातील साईनगर व पारधीनगर भागात घडला. एका ठिकाणाहून घेतलेले ५० हजार रुपयेसुद्धा पोलिसांनी या चौघांकडून जप्त केले.

उपकार्यकारी अभियंता दिलीप फुंडे, चालक जगदीश वर्मा, बुटीबोरी विभागीय भंडारमधील वरिष्ठ तंत्रज्ञ भूषण अंबादे व कर्मचारी तेजेश्वर पिने (रा. सिंधी रेल्वे, वर्धा) अशी आरोपींची नावे आहेत. हे चारही आरोपी वीज महावितरणचे अधिकारी-कर्मचारी आहेत. कार क्र. एमएच ४९ बी झेड २७२२ असून, ही आकाशवाणी नागपूर येथील कार्यालयात भाडे तत्त्वावर नेमली आहे.

Mahavitaran
Mahavitaran : महावितरणच्या चाकण उपविभागाचे विभाजन

याच कार्यालयात भाड्याने असलेल्या कारमध्ये बसून तेथून ते साईनगर येथील किशोर फाटकर यांच्या घरी आले. ‘‘आम्ही वीज वितरण कंपनीचे अधिकारी असून, मीटर तपासायचे आहे असे बोलून ते मीटरकडे गेले. त्यातील एकाने तुमचे मीटर सदोष असून, तुम्ही वीजचोरी करता. दंड भरावा लागेल, अन्यथा कारवाई करण्यात येईल,’’ अशी धमकी दिली. त्या वेळी किशोर फाटकर यांच्या पत्नी एकट्याच घरी होत्या. त्यांनी पतीला फोन करून बोलावले. किशोर घरी आल्यानंतर त्यांनी पुन्हा दमदाटी केली. आम्हाला नियमित बिल येत असल्याचे किशोर यांनी सांगूनही त्यांचे ऐकले नाही. ३० हजार रुपये द्या; अन्यथा मीटर बंद करतो, असे सांगून ३० हजार रुपये घेऊन निघून गेले.

त्यानंतर फाटकर यांनी तज्ज्ञ वायरमनकडून मीटर चेक केले असता ते व्यवस्थित असल्याचे लक्षात आले. त्यांनी याबाबत चौकशी केली तर विभागाची अशी कुठलीही कार्यवाही सुरू नसल्याचे कळले. आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर परत हे चौघेही त्याच कारने नजीकच्या पारधीनगर येथील राजेंद्र वारजूरकर यांच्या घरी आले. तिथेसुद्धा असाच धाक दाखवून त्यांच्याकडून ५० हजार रुपये घेतले.

Mahavitaran
Mahavitaran Mission 90 Days : अकोला परिमंडलात महावितरणचा ‘मिशन ९० दिवस’ उपक्रम

साईनगरात दोन दिवसांपासून फाटकर यांच्याकडे घडलेला प्रकार चर्चेत होता. परिसरातील काही तरुण यांच्या पळतीवर होते. वारजुरकर यांच्या घरून निघताच या तरुणांनी त्यांना घेरले. पावती न देता इतकी रक्कम कशी घेतली, हे विचारल्यावर ते गोंधळले. जमलेल्या तरुणांनी या तिघांनाही धरून ठेवले आणि एमआयडीसी पोलिसांना माहिती दिली.

ठाणेदार प्रवीण काळे आणि त्यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. चौघांनाही पोलिस ठाण्यात नेल्यावर ते उलटसुलट माहिती देत होते. त्यानंतर वीज वितरण कंपनीच्या स्थानिक आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना पोलिस ठाण्यात बोलावण्यात आले. त्यावेळी अधिकाऱ्यांनी अशा प्रकारे कारवाईच्या कुठल्याही सूचना नसल्याचे सांगितले. त्यामुळे पोलिसांनी चारही आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवला. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक संजय बनसोड करीत आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com