Babanrao Dhakne Death : लढवय्या नेता हरपला! माजी मंत्री बबनराव ढाकणे यांचे निधन

Babanrao Dhakne Passed Away : माजी केंद्रीय मंत्री बबनराव ढाकणे यांचे आज अहमदनगरमध्ये वयाच्या 86 व्या वर्षी निधन झाले.
Babanrao Dhakne
Babanrao Dhakne Agrowon
Published on
Updated on

Babanrao Dhakne News : माजी केंद्रीय मंत्री बबनराव दादाबा ढाकणे (Babanrao Dhakne) यांचे आज वयाच्या ८७ व्या वर्षी निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून न्युमोनिया आजारानं ग्रस्त होते.

अहमदनगर येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असताना गुरुवारी रात्री त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बबनराव ढाकणे हे चार वेळा आमदार आणि एक वेळा खासदार म्हणून निवडून आले होते. राज्यात आणि केंद्रात ढाकणे यांनी मंत्रिपद भूषवलं होतं.

('ॲग्रोवन'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Babanrao Dhakne
NAMO Sanman Nidhi : नमो योजनेतून शेतकऱ्यांच्या खात्यावर १ हजार ७२० कोटींची रक्कम, कोणत्या जिल्ह्याला किती निधी मिळाला?, आकडेवारी पाहा...

बबनराव ढाकणे यांचा जन्म अहमदनगरमधील पाथर्डी तालुक्यातील अकोले या छोट्याश्या गावातील शेतकरी कुटुबात 10 ऑक्टोबर 1937 रोजी जन्म झाला. शिक्षण घेत असताना त्यांनी गोवा मुक्ती संग्रामात भाग घेता होता.

विविध सामाजिक आंदोलनात सक्रीय असताना त्यांनी 1967 साली जिल्हा परिषदेची निवड लढवून विजयी झाले. त्यानंतर १९७८ साली काॅंग्रेसच्या तिकिटावर पाथर्डी विधानसभा मतदारसंघातून पहिल्यांदा विधानसभेवर निवडून गेले.

पुढे ते चार वेळेस आमदार राहिले. पुलोद सरकारमध्ये बांधकाम राज्यमंत्री आणि ग्रामविकास मंत्री म्हणूनही केले. 1989 साली बीड लोकसभा मतदारसंघातून विजयी झाल्यानंतर ते पंतप्रधान चंद्रशेखर यांच्या सरकारमध्ये उर्जा संसाधनमंत्री होते.

बबनराव ढाकणे यांचं पार्थिव आज पाथर्डी येथील हिंदसेवा वसतिगृहामध्ये आज दुपारी एक ते उद्या दुपारी एक वाजेपर्यंत अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. उद्या शनिवारी दुपारी दोन वाजता पाथर्डी तालुक्यातील पागोरी पिंपळगाव येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहे. त्यांच्या पश्चात मुलगा प्रतापराव ढाकणे, सून, नातवंडे असा परिवार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com