Manohar Joshi : माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे निधन

Former Maharashtra Chief Minister Manohar Joshi Passed Away : मनोहर जोशी यांनी मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात राज्यात गुंतवणूक यावी याकरिता ‘ॲडव्हान्टेज महाराष्ट्र’, शेतीतील गुंतवणूकीसाठी ‘ॲग्रो ॲडव्हान्टेज महाराष्ट्र’ अशा संकल्पनांना मुर्त रुप दिले.
Manohar Joshi
Manohar JoshiAgrowon
Published on
Updated on

Manohar Joshi Passes Away : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं आज शुक्रवारी (२३ फेब्रुवारी) पहाटे ३ च्या सुमारास निधन झालं. त्यांनी मुंबईत वयाच्या ८६ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. काल (दि. २२) गुरुवारी रात्री मनोहर जोशी यांना हृदयविकाराचा झटका आला होता. यानंतर त्यांना उपचारासाठी हिंदूजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने राजकीय वर्तुळावर शोककळा पसरली आहे. दरम्यान राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आपला नियोजित दौरा रद्द करून मुंबईत दाखल झाले आहेत.

राज्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी शिवसेनेच्या स्थापनेपासून दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या निकटवर्तीयांपैकी मानले जायचे. त्यांनी विधानपरिषदेचे आमदार, मुंबईचे महापौर, विधानसभेतील विरोधी पक्षनेते, मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री, लोकसभा अध्यक्ष, राज्यसभा सदस्य अशी अनेक पदे भूषवली होती. शिवसेनेचा पहिला मुख्यमंत्री होण्याचा मान त्यांना मिळाला होता. गेल्या अनेक दिवसांपासून प्रकृतीच्या कारणास्तव जोशी महाराष्ट्राच्या राजकारणापासून दूर होते.

राजकीय कारकिर्द

१९७६ ते १९७७ या काळात मनोहर जोशी मुंबईचे महापौर होते. राज्याच्या निवडणुकीत शिवसेना-भारतीय जनता पक्ष युतीने काँग्रेसचा पराभव केल्यावर ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले. 1999 च्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत मुंबई सेंट्रल मतदारसंघातून ते विजयी झाले.

Manohar Joshi
Sugar Rate : मोदी सरकारच्या धोरणामुळे साखर कारखानदारीसह शेतकऱ्यांमध्ये कडवटपणा

मनोहर जोशींचे महत्वपूर्ण निर्णय

महाराष्ट्रात गुंतवणूक यावी याकरिता त्यांनी ‘ॲडव्हान्टेज महाराष्ट्र’, शेतीतील गुंतवणूकीसाठी ‘ॲग्रो ॲडव्हान्टेज महाराष्ट्र’ अशा संकल्पनांना मुर्त रुप दिले. महाराष्ट्रातील पायाभूत सुविधांच्या विकासाचा एक्स्प्रेस –वे म्हणता येईल असा मुंबई – पुणे द्रुतगती महामार्ग त्यांच्याच काळात साकारला गेला. सिंचनातील कृष्णा खोरे विकास महामंडळाची सुरुवातही त्यांच्याच काळात झाली. ‘टँकरमुक्त महाराष्ट्र’ ही देखील त्यांचीच घोषणा. ‘महाराष्ट्र भूषण’ या राज्याच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराची सुरुवातही त्यांच्याच पुढाकाराने झाली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून आदरांजली

शिक्षणातील ‘सर’ ते लोकसभा अध्यक्ष म्हणून ‘स्पीकर सर’ अशी भारदस्त कारकीर्द असणाऱ्या महाराष्ट्र सुपुत्राला काळाने आपल्यातून हिरावून घेतले आहे, अशी भावना व्यक्त करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना श्रद्धांजली अर्पण केली. आपल्यासाठी वैयक्तिक पातळीवर ही मोठी हानी आहे, असे नमूद करुन मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र विकासाची चौफेर दृष्टी असलेल्या एका सुसंस्कृत, व्यासंगी नेत्याला मुकला असल्याचेही म्हटले आहे.

सुसंस्कृत नेता काळाच्या पडद्याआड : अजित पवार

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या निधनाने मराठी माणसांच्या न्याय्य हक्कांसाठी लढणारा सुसंस्कृत नेता काळाच्या पडद्याआड गेला आहे. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक, शिक्षण क्षेत्राची मोठी हानी झाली आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com