Ashok chavan : शून्य टक्के व्याजदराची पीककर्ज योजना संपुष्टात आणण्याचा डाव ; अशोक चव्हाण यांची टीका

Farmer loan : शून्य टक्के व्याजदर पीककर्ज योजनेत संदर्भात राज्य सरकारने केलेल्या बदलांवर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी टीका केली आहे.
Ashok Chavan
Ashok ChavanAgrowon
Published on
Updated on

Nanded News : शून्य टक्के व्याजदराच्या पीककर्ज योजनेचा लाभ घेण्यासाठी अगोदर मुद्दल व ६ टक्के दराने व्याजाचा भरणा करण्यासंदर्भात राज्य सरकारने घेतलेला निर्णय अन्यायकारक असून, यामागे योजनाच संपुष्टात आणण्याचा डाव आहे की काय, अशी टीका माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी मंगळवारी (ता. ३) केली.

Ashok Chavan
पुणे जिल्हा बॅंकेच्या शून्य टक्के व्याजाच्या लाभासाठी वीसच दिवस शिल्लक

शून्य टक्के व्याजदर पीककर्ज योजनेत संदर्भात राज्य सरकारने केलेल्या बदलांवर प्रतिक्रिया देताना ते बोलत होते. या वेळी राज्य सरकारवर हल्लाबोल करताना चव्हाण म्हणाले, की सदर योजनेसाठी पात्र शेतकऱ्यांना यापूर्वी पीककर्जाचा भरणा करताना व्याज देणे अनिवार्य नव्हते. केवळ मुद्दल भरून शेतकरी नव्या कर्जाची उचल करत होते. मात्र राज्य सरकारच्या नव्या निर्णयानुसार आता पीककर्जाच्या मुदलासमवेत ६ टक्के दराने व्याजही भरावे लागणार आहे. सव्याज कर्ज फेडले तरच शेतकऱ्यांच्या खात्यात व्याजाची रक्कम जमा केली जाईल, असा हट्ट राज्य सरकारने धरला आहे.

सद्यःस्थितीत सततची नैसर्गिक संकटे आणि शेतीमालाच्या घसरत्या किमतींमुळे शेतकऱ्यांना मूळ मुद्दल भरणेही अशक्य झालेले असताना राज्य सरकारने हा जुलमी निर्णय घेतला आहे. ६ टक्के दराने व्याज भरण्याची सक्ती शेतकऱ्यांची पिळवणूक आहे. सवंग लोकप्रियतेसाठी एकीकडे शेतकऱ्यांना २ हजार रुपये देणारी योजना जाहीर करायची आणि दुसरीकडे शेतकऱ्यांसाठी असलेल्या योजनांच्या अटी-शर्ती कठोर करून भविष्यात त्या योजना बंदच करायच्या, असा हा डाव असल्याचा संशयही चव्हाण यांनी व्यक्त केला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com