
Maharashtra Forest Department Recruitment: महाराष्ट्र वन विभागाअंतर्गत येणाऱ्या पेंच व्याघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठान अंतर्गत विविध पदांची भरती करण्यात येणार आहे. यात एकूण विविध १६ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या पदांची कंत्राटी स्वरुपाची भरती केली जाणार आहे.
जीवशास्त्रज्ञचे १ पद भरले जाणार असून अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षणसंस्थेतून वन्यजीवन विज्ञान / प्राणीशास्त्र / वानिकी / वनस्पतिशास्त्र / पर्यावरणशास्त्रा मध्ये पदव्युत्तर किमान ६०% गुणांसह उत्तीर्ण व पीएचडी पूर्ण करणे आवश्यक आहे. या पदासाठी निवड झालेल्या उमेदवाराला दरमहा ३० हजार रुपये इतका पगार दिला जाईल.
पशुवैद्यकीय अधिकारीचे १ पद भरले जाणार असून अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षणसंस्थेतून ६०% गुणांसह पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक आहे. अवन्यजीव विषयासह पदव्युत्तर पदवी (एम.व्ही.एस.सी) असणाऱ्या उमेदवारांना यात प्राधान्य देण्यात येईल.या पदासाठी निवड झालेल्या उमेदवाराला दरमहा ५० हजार रुपये इतका पगार दिला जाईल.
निसर्ग पर्यटन व्यवस्थापकची २ पदे भरली जातील. यासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षणसंस्थेतून कोणत्याही शाखेतील पदवीधर, हॉस्पिटॅलिटी आणि हॉटेल मॅनेजमेंट / पर्यटन व्यवस्थापन यात पदविका असणे आवश्यक आहे. या पदासाठी निवड झालेल्या उमेदवाराला दरमहा २५ हजार रुपये इतका पगार दिला जाईल.
सहाय्यक निसर्ग पर्यटन व्यवस्थापकची २ पदे भरली जातील. यासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षणसंस्थेतून कोणत्याही शाखेतील पदवी, हॉस्पिटॅलिटी आणि हॉटेल मॅनेजमेंट / पर्यटन व्यवस्थापन यात पदविका असणे गरजेचे आहे. या पदासाठी निवड झालेल्या उमेदवाराला दरमहा १५ हजार रुपये इतका पगार दिला जाईल.
उपजीविका तज्ञची २ पदे भरली जातील. यासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षणसंस्थेतून सामाजिक कार्य शाखेत पदव्युत्तर पदवी (MSW) / ग्रामीण व्यवस्थापनात / कृषी व्यवस्थापनात एमबीए असणे आवश्यक आहे. तसेच उमेदवाराला ग्रामीण क्षेत्रात उपजिवीका तज्ञ म्हणुन किमान २ वर्षाचा अनुभव असाला. किंवा कोणत्याही शाखेतील पदवीधर व उपजिवीका तज्ञ या कामाचा कमीत कमी ५ वर्षाचा अनुभव असलेल्यांना प्राधान्य देण्यात येईल. या पदासाठी निवड झालेल्या उमेदवाराला दरमहा ३० हजार रुपये इतका पगार दिला जाईल.
सर्वेक्षण सहाय्यकचे १ पद भरले जाणार असून यासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षणसंस्थेतून कोणत्याही शाखेतील पदवी असणे आवश्यक आहे. यासोबतच टंकलेखन वेग इंग्रजी ४० शप्रमी, मराठी ३० शप्रमी. सर्वेक्षण / जमीन विषयक / जीआयएस मध्ये अनुभव असावा. या पदासाठी निवड झालेल्या उमेदवाराला दरमहा १५ हजार रुपये इतका पगार दिला जाईल.
GIS तज्ञचे १ पद भरले जाणार आहे. यासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षणसंस्थेतून विज्ञान पदवी किंवा भूगोल विषयात बी. ए. असणे आवश्यक आहे. यासोबतच जीआयएस विषयाचा कमीत कमी ३ वर्षांचा प्रत्यक्ष अनुभव असावा. या पदासाठी निवड झालेल्या उमेदवाराला दरमहा ३ हजार रुपये इतका पगार दिला जाईल.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.