Forest Fire : सातपुड्यात वणवे पेटू लागले; वन विभागाचे दुर्घटनांकडे दुर्लक्ष

Forest Department : सातपुडा पर्वतात वणवे पेटू लागले आहे. यात मौल्यवान वनसंपदेची हानी होत असून, वणवे पेटण्याचे प्रकार, त्यामागील कारणे याचा शोध केव्हा घेतला जाईल, हा मुद्दा आहे.
Forest Fire
Forest Fire Agrowon

Jalgaon News : सातपुडा पर्वतात वणवे पेटू लागले आहे. यात मौल्यवान वनसंपदेची हानी होत असून, वणवे पेटण्याचे प्रकार, त्यामागील कारणे याचा शोध केव्हा घेतला जाईल, हा मुद्दा आहे.

खानदेशात नंदुरबारातील अक्कलकुवा, धडगाव, शहादा, तळोदा, धुळ्यातील शिरपूर, जळगावमधील चोपडा, यावल व रावेर या भागालगत सातपुडा पर्वत आहे. सातपुड्याच्या पलिकडे मध्य प्रदेश आहे.

यावल अभरारण्याचा ठेवा याच सातपुडा भागात आहे. त्यासंबंधी अनेक घोषणा, योजना आहे. वन विभागाचा मोठा ताफा सातपुड्याच्या सुरक्षेसाठी आहे. परंतु वणवे दरवर्षी पेटतात. त्यावर नियंत्रण आले की वन विभाग पुढे शांत होतो. पण वणवे का पेटतात की जाणीवपूर्वक पेटविले जातात, याचा शोध घेतला जात नाही.

Forest Fire
Forest Fire: शिकारीसाठी ठाण्यात डोंगरांना आग

अमूल्य डिंक निर्मितीसाठी हे वणवे पेटविले जातात. झाडांना आग लावल्यास डिंक चांगला तयार होतो, असा समज चोरट्या, माफिया मंडळीत आहे. तसेच काही वृक्ष पेटल्यानंतर त्यांची कत्तल करून वाहतूकही सोपी होते, यामुळे हे वणवे दरवर्षी पेटतात, असा दावा जाणकार, पर्यावणप्रेमी करतात.

Forest Fire
Forest Fire : गवत वणवे अन् भूजलचा काय संबंध?

काही स्वयंसेवी संस्था सातपुड्याच्या संरक्षणासाठी प्रयत्नशील आहेत. परंतु अवैध वृक्षतोड सुरूच आहे. अनेकदा सागवान व अन्य जातीच्या वृक्षांचे बाजारात मागणी असलेले लाकूड जप्त केल्याच्या घटना यावल, चोपडा, रावेर भागात घडतात. कमाल भाग सातपुड्यात बोडका झाला आहे. जो भाग वृक्षराजीने नटला आहे, तो देखील धोक्यात असल्याचा मुद्दा सतत ऐरणीवर येत आहे.

नुकतीच अडावद (ता. चोपडा) हद्दीतील सातपुड्यातील कुंड्यापाणी भागात वणवा पेटल्याची घटना घडली. मोठा भडका उडाल्यानंतर वन विभाग जागी झाला व आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न सुरू झाले. हा वणवा एवढा मोठा होता की तो सुमारे २० ते २५ किलोमीटर अंतरावरूनही दिसत होता. यात वनसंपत्ती जळून खाक झाली. वन विभागाच्या पथकाने काही तासांत आग विझविली, परंतु वृक्षराजी खाक झाली.

पर्यटकांमुळेही समस्या

अनेकदा पर्यटक, निसर्गप्रेमी आदी सातपुड्यात अवैधपणे जातात. यात अनावधानाने आगकाडी किंवा अन्य बाबींमुळे आग लागते. यामुळे काही महत्त्वाच्या, संवेदनशील भागात पर्यटकांना जाण्यास बंदी केली पाहिजे, असाही मुद्दा उपस्थित केला जात आहे. आग लागल्याची घटना घडल्याने वन विभागाने पर्यटकांनी किंवा नागरिकांनी सातपुड्यातील वनक्षेत्रात अवैधपणे जाऊ नये, असे म्हटले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com