Wildlife Water Issue : वन्यप्राण्यांची तहान भागतेय कृत्रिम जलसाठ्यावर

Sanctuary Water Crisis : वाशीम आणि अकोला जिल्ह्यांमध्ये पसरलेल्या विस्तीर्ण काटेपूर्णा अभयारण्यातील नैसर्गिक जलस्रोत उन्हाळ्यामुळे आटले आहेत. यामुळे वन्यप्राण्यांना पाण्याची मोठी समस्या जाणवत आहे.
Wildlife Sanctuary Water Crisis
Wildlife Sanctuary Water Crisis Agrowon
Published on
Updated on

Washim News : वाशीम आणि अकोला जिल्ह्यांमध्ये पसरलेल्या विस्तीर्ण काटेपूर्णा अभयारण्यातील नैसर्गिक जलस्रोत उन्हाळ्यामुळे आटले आहेत. यामुळे वन्यप्राण्यांना पाण्याची मोठी समस्या जाणवत आहे.

त्यांची ही गरज ओळखून वन विभागाने तातडीने उपाययोजना करीत अभयारण्यात विविध ठिकाणी तब्बल २८ कृत्रिम पाणवठे तयार करण्यात आले. त्यात टँकरच्या साहाय्याने नियमितपणे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. काटेपूर्णा अभयारण्य हे वन्यजीवांसाठी एक महत्त्वाचे आश्रयस्थान आहे.

Wildlife Sanctuary Water Crisis
Parbhani Water Crisis : परभणी जिल्ह्यातील सहा लघु तलाव कोरडे

येथे बिबट, अस्वल, हरीण, तरस, भेकर, ससे, रानडुक्कर, नीलगाई यांसारख्या अनेक प्रजातींचे प्राणी मोठ्या संख्येने वास्तव्य करतात. उन्हाळ्यात नैसर्गिक पाणवठे कोरडे पडल्याने या प्राण्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. अनेकदा ते पाण्याच्या शोधात मानवी वस्त्यांकडेही येतात. यामुळे त्यांच्या जिवाला धोका निर्माण होतो.

Wildlife Sanctuary Water Crisis
Maharashtra Water Crisis: राज्यात पाणीटंचाईचे संकट

परिसरातील रस्त्यांची कामे आणि मानवनिर्मित वणवे यामुळे परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे. या पार्श्वभूमीवर, वन्यजीवांना पिण्याच्या पाण्याची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी वन विभागाने उचललेले पाऊल अत्यंत महत्त्वाचे आहे.

काटेपूर्णा अभयारण्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी पवन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वनविभागाचे कर्मचारी या कृत्रिम पाणवठ्यांमध्ये नियमितपणे पाणी भरत आहेत. या प्रयत्नांमुळे वन्यप्राण्यांना त्यांच्या अधिवासातच पाणी उपलब्ध होणार आहे आणि त्यांची भटकंती थांबणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com