
Hingoli News : आगामी (२०२३) खरीप हंगामातील संभाव्य पावसाच्या खंडामुळे उद्भवणाऱ्या परिस्थितीचा एकंदरीत विचार करून शेतकऱ्यांना पीक नियोजन (Crop Planning) करता यावे यासाठी प्रत्येक गावात ग्रामसभा घ्याव्यात. नव्याने शिफारस केलेल्या पीक लागवड तंत्रज्ञानाची माहिती शेतकऱ्यांना द्यावी, असे निर्देश कृषिमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी दिले.
सोमवारी (ता. १) जिल्हा नियोजन सभागृहात आयोजित खरीप हंगाम नियोजन आढावा बैठकीत सत्तार बोलत होते. या वेळी आमदार तान्हाजी मुटकुळे, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने, उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवराज घोरपडे, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक एस. डी. सावंत यांची उपस्थिती होती.
सत्तार म्हणाले, की बोगस बियाणे व खतांमुळे शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही याची सर्व संबंधितांनी दक्षता घ्यावी. प्राथमिक शिक्षणात कृषी अभ्यासक्रमाद्वारे शेतीतील नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती मिळणार आहे.
पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेचा लाभ जास्तीत जास्त शेतकऱ्यांना देण्यासाठी बँकेने सकारात्मक दृष्टिकोन ठेवून काम करावे. उद्दिष्ट वेळेत पूर्ण करावे.
याबाबत दिरंगाई केल्यास संबंधित बँक अधिकाऱ्यांवर कारवाई करावी. तसेच येत्या खरीप हंगामात पीक कर्ज वितरणासाठी बँकानी योग्य नियोजन करून पीक कर्ज वितरणाचे उद्दिष्ट पूर्ण करावे.
ज्या बॅंका शेतकऱ्यांना पीक कर्ज वितरित करण्याबाबत टाळाटाळ किंवा दिरंगाई करतील त्या बॅंकांचा जिल्हाधिकाऱ्यांनी आढावा घेऊन त्यांना तत्काळ पीक कर्ज वितरण करण्याचे निर्देश देऊन दररोज याबाबत पाठपुरावा करावा.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.