Food Safety: अन्न व औषध प्रशासनाकडून ४५ प्रकरणे न्यायालयात दाखल

Unsafe Food Alert: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात गेल्या सहा महिन्यांत १९ प्रकरणांमध्ये १ लाख रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. तर ४५ प्रकरणे न्यायालयात दाखल केले आहेत.
Food Safety
Food SafetyAgrowon
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात गेल्या सहा महिन्यांत १९ प्रकरणांमध्ये १ लाख रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. तर ४५ प्रकरणे न्यायालयात दाखल केले आहेत. सर्व्हेक्षण म्हणून ५५४ नमुने घेण्यात आले असल्याची माहिती समितीचे सदस्य सचिव तथा सहायक आयुक्त अन्न व औषध प्रशासन द. वि. पाटील यांनी दिली.

सुरक्षित अन्न व आरोग्यदायक आहार सल्लागार समितीची मंगळवारी (ता. ८) जिल्हास्तरीय सुकाणू समितीची बैठक पार पडली. या प्रसंगी सहायक आयुक्त श्री. पाटील, डॉ. सारिका लांडगे, डॉ. महेश लड्डा, महिला व बालविकास विभागाचे आर. आर. भिमनवार आदी समिती सदस्य या वेळी उपस्थित होते.

Food Safety
Food Safety First: भेसळयुक्त अन्न रोखण्यासाठी २० जण तैनात

बैठकीत पुढे आलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यात आतापर्यंत (जानेवारी ते जून २०२५) करण्यात आलेल्या कारवाईची माहिती देण्यात आली. त्यानुसार, दूध व दुग्धजन्य पदार्थांचे ४६ नमुने तपासणीसाठी घेण्यात आले. ११ नमुने असुरक्षित असल्याचे आढळून आले. पनीरचे १८ नमुने घेण्यात आले त्यात २ नमुने असुरक्षित होते. ईट राईट इंडिया चॅलेंज अंतर्गत शाळा, महाविद्यालये, शासकीय कार्यालये यांच्या कॅन्टीन सुविधांचे निर्जंतूकता गुणांकन करण्यात आले.

Food Safety
Food Safety : दूषित घटकांचे आरोग्यावर परिणाम

उन्हाळ्यात शीतपेये, उसाचा व फळांचा रस विक्रेते, खाद्य बर्फ विक्रेते, बाटलीबंद पाणी विक्रेते यांच्या तपासण्या करण्यात आले. १९ नमुने तपासण्यात आले त्यात १ नमुना असुरक्षित असल्याचे दिसून आले. आंब्यांचे नमुनेही घेण्यात आले. त्याचे अहवाल प्रलंबित आहेत. जिल्ह्यात एकूण २५७ नमुने घेण्यात आले त्यात १५ नमुने असुरक्षित होते तर ४ नमुने हे बनावट होते. इतर अन्न पदार्थ तपासणी करण्यासाठी ३५८ तपासण्या करण्यात आल्या.

मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या १०० दिवसांच्या कार्यालय सुधारणा कार्यक्रमात छत्रपती संभाजीनगर येथील अन्न व औषध प्रशासन विभागाच्या कार्यालयाचा विभागस्तरावर प्रथम क्रमांक आला. तसेच जिल्ह्यात ईट राईट इंडिया चॅलेंज अंतर्गत छत्रपती संभाजीनगर परिमंडळ १ या कार्यालयाने प्रथम क्रमांक पटकावला आहे. या अंतर्गत जिल्ह्यात अंगणवाडी सेविका, अन्न पदार्थ विक्रेते यांना अन्न सुरक्षा विषयक प्रशिक्षण देण्यात आले.

नजीकच्या काळात श्रावण महिना व लगोलग येणारे विविध धार्मिक सण उत्सव येत आहे. या कालावधीत अन्न सुरक्षा मानकांचे पालन होत आहे किंवा नाही या बाबत खाद्यपदार्थ विक्रेते, हॉटेल्स, रेस्टॉरंट चालकांकडे अधिक काटेकोर तपासणी करावी. तसेच शाळा, महाविद्यालय परिसरात खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्यांचीही तपासणी करावी.
- दिलीप स्वामी, जिल्हाधिकारी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com