Fogger System : गोठा थंड ठेवण्यासाठी ‘फॉगर’ प्रणाली

Animal Care : उन्हाळ्यात दिवसेंदिवस वाढणाऱ्या तापमानाचा जसा परिणाम नागरिकांवर होत आहे. तसाच तो जनावरांवर होत असल्याने जनावरांना उन्हाचा त्रास कमी व्हावा या उद्देशाने कळवण येथील शेतकरी रवींद्र दामू पगार यांनी गोठ्यामध्ये फॉगर सिस्टीम बसविली.
Animal Care
Animal Care Agrowon

Nashik News : उन्हाळ्यात दिवसेंदिवस वाढणाऱ्या तापमानाचा जसा परिणाम नागरिकांवर होत आहे. तसाच तो जनावरांवर होत असल्याने जनावरांना उन्हाचा त्रास कमी व्हावा या उद्देशाने कळवण येथील शेतकरी रवींद्र दामू पगार यांनी गोठ्यामध्ये फॉगर सिस्टीम बसविली. यामुळे गोठा थंड राहत असून जनावरांवर उन्हाचा त्रास होत नसल्याने श्री. पगार यांनी सांगितले.

कळवण तालुक्यात उन्हाळा तीव्र असल्यामुळे जनावरांनाही याचा त्रास होतो आहे. वाढत्या उन्हामुळे त्याचा विपरित परिणाम दूध उत्पादनावर, जनावरांच्या पोषणावर तसेच प्रजननक्षमतेवर होत असतो. दूध देणाऱ्या जनावरांना थंड हवामान मानवते. जर जनावरे सतत उन्हाच्या संपर्कात येत असतील, तर त्याच्या आरोग्यावर विपरित परिणामदेखील दिसून येतो.

Animal Care
Animal Disease Solution : जनावरांच्या आजारांवर उपाययोजना

त्यामुळे गोठ्या जनावरे बांधल्यानंतर त्यांना उन्हाचा त्रास कमी व्हावा या हेतूने श्री. पगार यांनी गोठ्यातच ‘फॉगर’ प्रणाली लावली आहे. ‘फॉगर’मुळे गोठा थंड राहतो. ‘फॉगर’मधून जे पाणी बाहेर येते ते पाणी हवेमध्ये मिसळून जाते. त्यामुळे जनावरे किंवा चारा भिजत नाही. वीज नसेल तर ही प्रणाली बॅटरीवरही चालवता येते. गोठ्याच्या आकारानुसार ही प्रणाली बसवता येते.

उन्हाळ्यात जनावरांना अल्प खाद्य, कमी व वाळलेला चारा, अल्प पाणी व अति उष्णता यांचा त्रास होतो. जगण्यासाठी आवश्यक त्याच शरीरक्रियांचा बराच ताण असतो. तीव्र उन्हामुळे प्रजननक्रिया थांबते अथवा त्यास हानी पोहोचते. मार्च ते जून या काळात वातावरणातील उष्णता फार वाढते. त्यामुळे जनावरांची योग्य काळजी घेणे गरजेचे असते. यासाठी उन्हाळ्यात जनावरांना गोठा अथवा सावलीत बांधणे, त्यांना मुबलक व स्वच्छ पाणी देणे महत्त्वाचे असते.

Animal Care
Animal Care : राज्यात ३० हजार जनावरांत ‘मसल प्रिंट’ तंत्रज्ञान वापरणार
माझ्याकडे एकूण ४० पशुधन आहे. तीव्र उन्हाचा जनावरांना त्रास होऊ नये म्हणून मी गोठ्यात फॉगर सिस्टीम लावली आहे. दर तासाला १५ ते २० मिनिटे हे सिस्टीम चालू ठेवल्याने गोठा पूर्णपणे थंड राहतो. त्यामुळे तीव्र उन्हाळ्याचा तापमानाचा त्रास जनावरांना होत नाही. गोठ्यात २० फॉगरसाठी मला पंचवीस हजार रुपये खर्च आला.
रवींद्र दामू पगार, दूध उत्पादक शेतकरी, कळवण
सध्या तापमान वाढले आहे. त्यामुळे उन्हाच्या तीव्र झळ्याचा जनावरांवर देखील परिणाम होतो. यासाठी शेतकऱ्यांनी फॉगर सिस्टीम बसवावी. त्यामुळे जनावरांना वाढत्या तापमानाचा त्रास होत नाही व जनावरे आजारीही पडत नाहीत.
डॉ. डी. एन. पावसे

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com