Animal Fodder : चारा मुबलक; माळरानातही हिरवळ

Animal Feed : या वर्षी जिल्ह्यात चारा मुबलक आहे. चाऱ्याचा दर्जा अतिपावसात घसरला आहे. पण चारा उपलब्ध असून, माळरानातही हिरवळ आहे.
Animal Fodder
Animal Fodderagrowon
Published on
Updated on

Jalgaon News : या वर्षी जिल्ह्यात चारा मुबलक आहे. चाऱ्याचा दर्जा अतिपावसात घसरला आहे. पण चारा उपलब्ध असून, माळरानातही हिरवळ आहे. चाऱ्याची टंचाई यंदा नसणार कारण, रब्बीही जोमात व हव्या तेवढ्या क्षेत्रात राहील, असे दिसत आहे.

मागील हंगामात किंवा वर्षी गंभीर दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती. जळगावातील चाळीसगाव, पारोळा, अमळनेर, भडगाव, बोदवड, धुळ्यातील साक्री, शिंदखेडा, धुळे, नंदुरबार आदी भागांत संकट होते.

चाराच नसल्याने शेतकरी रडकुंडीला आला होता. शेतकऱ्यांकडे शिल्लक असलेला चारा जानेवारीतच संपत आल्याने चाराटंचाईने शेतकरी पशुपालक त्रस्त झाले होते. मागील उन्हाळ्यात दुष्काळजन्य स्थिती, पशुखाद्याचे व चाऱ्यांचे वाढलेले भाव, या विविध कारणांमुळे दुधाळ पशुधनाचा सांभाळ अडचणीचा ठरला होता.

Animal Fodder
Animal Fodder : निकृष्ट चाऱ्याची पौष्टिकता वाढविण्याचे तंत्र

काठेवाडी, मेंढपाळांनाही दुष्काळाच्या झळा बसल्या होत्या. दुष्काळी भागात लवकरात लवकर चारा छावण्या सुरू कराव्यात, अशी मागणी होती. सर्वत्र दुष्काळाचे चटके बसले. चारा व पाण्याची टंचाई भासू लागली होती. जूनमध्येही टँकर होते. त्याला आता गिरणा परिसरदेखील अपवाद राहिलेला नव्हता.

यंदा मात्र तशी स्थिती नाही. चाऱ्याचा दर्जा पावसाने खराब झाला आहे. पण निरभ्र वातावरण, उन्हात चाऱ्याची स्थिती सुधारत आहे. तसेच माळरानातही हिरवा चारा आहे. रब्बी हंगामातही ज्वारी, मका, बाजरी आदींची पेरणी अपेक्षित क्षेत्रात होईल. तसेच गहू, हरभरा यांची काडही चारा म्हणून उपलब्ध होईल. खानदेशात अनेक शेतकऱ्यांनी ऊस व केळीची लागवड केली आहे. ही लागवड यंदा वाढली आहे. सर्वत्र हिरवा चारा पुढेही उपलब्ध होईल, अशी स्थिती आहे.

Animal Fodder
Animal Fodder : शेतकऱ्यांचे चारासंकट टळले

चारा दर स्थिरावरणार

मागील वेळेस जळगावातून धुळे जिल्ह्यातील शिरूड, तरवाडे, मालेगाव व नाशिक जिल्ह्यातील शेतकरी घेऊन जात होते. परंतु यंदा चाऱ्याची पळवापळवी होणार नाही. पुढे उसाचा चारा उपलब्ध होईल. तसेच कोरडा चाराही आहे. यामुळे चारा दर स्थिरावतील. चारा दरात कुठलीही वाढ पुढे होणार नाही, अशी स्थिती आहे.

जनावरांची संख्या मात्र घटली

मागील वर्षातील दुष्काळी परिस्थितीमुळे चाऱ्याची प्रचंड टंचाई निर्माण झाली होती. याचा दुधाळ पशुधनाला अधिक फडटका बसला. रोजच्या रोज पशुखाद्याचे व चाऱ्यांचे भाव वाढत होते. आदी कारणांमुळे गुरांची संख्या घटली होती. ती अजूनही वाढलेली नाही. ग्रामीण भागात २०१२ च्या पशू गणनेनुसार गाय, म्हैस, बैल, शेळ्यांसह इतर पाळीव प्राण्यांची संख्या १ लाख ६५ हजार ८१९ आहे. यात दुधाळ पशुधनही घटले होते. त्यात पुढे वाढ होईल, अशी स्थिती आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com