Fodder Cultivation : आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांत ६०० एकर गायरानावर होणार चारा लागवड

Farmer Suicide : विदर्भासह मराठवाड्यातील आत्महत्या नियंत्रणाच्या उद्देशाने शासनाकडून (कै.) वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनची अंमलबजावणी केली जात आहे.
Fodder Cultivation
Fodder CultivationAgrowon
Published on
Updated on

Nagpur News : रोजगार हमी योजनेतून गायरान जमिनीवर चारा लागवडीसंदर्भाने शासन परिपत्रक आहे. त्याचाच आधार घेत (कै.) वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनच्या माध्यमातून आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमध्ये चारा लागवडीला प्रोत्साहन दिले जात आहे. पहिल्या टप्प्यात सुमारे सहाशे एकरावर चारालागवडीचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.

विदर्भासह मराठवाड्यातील आत्महत्या नियंत्रणाच्या उद्देशाने शासनाकडून (कै.) वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनची अंमलबजावणी केली जात आहे. ॲड. नीलेश हेलोंडे पाटील हे सध्या या मिशनचे अध्यक्ष आहेत. दरम्यान शेतीपूरक दुग्ध व्यवसायातून शेतकऱ्यांच्या जीवनात संपन्नता येऊ शकते.

Fodder Cultivation
Fodder Cultivation Pattern : मराठवाड्याचा चारा लागवड पॅटर्न मार्गदर्शक

या जाणीवेतून मिशनमधून पशुपालनाकरिता शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले जात आहे. मात्र हा व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांना चाऱ्याची गरज भासणार आहे. त्याकरिता गावांत उपलब्ध गायरान जमिनीचा विनियोग करण्याच्या सूचना मिशनमधून देण्यात आल्या आहेत.

शासनाच्या ७ जून रोजीच्या परित्रकाचा याकामी उपयोग घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यंदा विदर्भात गायरान जमिनीवर सुमारे ६०० एकरावर चारा लागवड प्रस्तावित आहे. त्यानुसार कामाला सुरुवात झाली असून २०० एकरापेक्षा अधिक गायरान जमिनीवर आतापर्यंत लागवड झाली आहे.

Fodder Cultivation
Fodder Cultivation : गायरान जमिनीवर चारा लागवड करा

वन विभाग, पशुसंवर्धन, रोजगार हमी योजनेच्या सहकार्यातून यवतमाळ जिल्ह्यात १७० एकरावर चारा लागवडीचे उद्दिष्ट आहे. त्यापैकी १०० एकरावर लागवड झाली आहे. पशुधन विकास अधिकारी तांत्रिक तर महसूलकडून प्रशासकीय मान्यता दिली जाते. त्याआधारे मजुरांचे मस्टर तयार करून चारालागवड होते. यवतमाळ जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया या उपक्रमासाठी फार आग्रही आहेत. यवतमळ जिल्ह्यात ९३९ हेक्‍टर जमीन उपलब्ध आहे. - डॉ. विजय राहाटे, जिल्हा उपायुक्‍त पशुसंवर्धन, यवतमाळ.

गावातील गायरान जमिनीवर सुपर नेपियर गवताची लागवड केल्यास त्यापासून सलग चारा वर्षे चारा मिळतो. ७० दिवसांनी चारा कापणीस येतो. एका वर्षांत तीस हजार टन चारा उत्पादन होणार आहे. त्याबरोबरच चारा बियाण्याचा देखील वापर होईल. चारा असेल तर शेतकरी पशुपालन व दुग्धव्यवसायाकडे वळतील.
- ॲड. नीलेश हेलोंडे पाटील, अध्यक्ष शेती (कै.) वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशन

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com