Fodder Crop : रब्बीत चारा पिकांना प्राधान्य

Rabi Season : परतीचा पाऊसही फारसा पडण्याची शक्यता दिसत नसल्याने कृषी विभाग, प्रशासनानेही चारा पिके घेण्याचे आवाहन केले.
Fodder Crop
Fodder CropAgrowon
Published on
Updated on

Nagar : जिल्ह्यात यंदा पावसाचे प्रमाण कमी असल्याने पशुधनासाठी आगामी काळात चारा पिकांची टंचाई भासण्याच्या शक्यतेने शेतकऱ्यांनी चारापिके घेण्याला प्राधान्य दिले आहे. यंदा खरिपात सुमारे ८४ हजार ६०५ हेक्टरवर चारा पिके घेतली आहेत. रब्बीतही शेतकरी चारा पिकांना प्राधान्य देणार असल्याचे दिसतेय.

Fodder Crop
Rabi Sowing : खानदेशात रब्बी पेरणी कमी होण्याचे संकेत

जिल्ह्यात शेतीला बहुतांश शेतकऱ्यांनी पशुपालनाची जोड दिली आहे. विशेषतः जिल्ह्याच्या उत्तर भागासह दक्षिणेतही शेतकरी दूध व्यवसायाला प्राधान्य देत आहेत. यंदा मात्र पावसाळ्याच्या सुरुवातीपासूनच पुरेसा पाऊस नाही. त्यात मध्यंतरीच्या काळात पावसाने खंड दिल्याचा खरिपाच्या पिकांवर फटका बसला. खरिपातील बाजरी, मूग, उडीद, सोयाबीन या पिकांपासून चारा मिळतो.

Fodder Crop
Rabi Season : वऱ्हाडात रब्बी अधांतरीच जमिनीत ओलावा, प्रकल्पांत पाणीसाठा कमी

यंदा ही पिके पूर्णतः वाया गेली आहेत. सुरुवातीलापासून पाऊस नसल्याचे दिसताच यंदा चारा टंचाई निर्माण होऊ शकते, असा अंदाज धरुन शेतकऱ्यांनीच चारा पिके घेण्याला प्राधान्य दिले आहे.शिवाय पावसाचा खंड पडला, परतीचा पाऊसही फारसा पडण्याची शक्यता दिसत नसल्याने कृषी विभाग, प्रशासनानेही चारा पिके घेण्याचे आवाहन केले.

Fodder Crop
Rabi Season : खरीप लांबल्यामुळे रब्बी अडचणीत

पशुसंवर्धन विभागाने यंदा चारा उत्पादनासाठी पाणी उपलब्धता असलेल्या भागात चारा पिके घेण्यासाठी यंदा एक कोटी रुपयांची बियाणे शेतकऱ्यांना वाटप केले आहेत. या सर्व बाबीमुळे चारा पिकांचे क्षेत्र यंदा वाढले आहे. खरिपात संगमनेर तालुक्यात सर्वाधिक साडेपंधरा हजार हेक्टरवर पिके घेतले आहेत. उत्तरेत पाणी उपलब्धता अधिक आहे. त्यामुळे या भागात चारा पिके घेण्याला प्राधान्य आहे.

चारापिकांचे क्षेत्र (हेक्टर)
नगर : ६००९, पारनेर : ९८६४, श्रीगोंदा : ९१५६, कर्जत : ७६९२, जामखेड : १२५०, शेवगाव : १५९२, पाथर्डी : ३९९७, नेवासा : ६६९१, राहुरी : ५१०४, संगमनेर : १५,४५९, अकोले : १२४९, कोपरगाव : ५०७६, श्रीरामपूर : ४५५३, राहाता : ६९१३.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com