Fodder Shortage : सांगलीत १५ लाख टन चारा; टंचाईचे सावट दूर

Fodder Subsidy : सांगली जिल्ह्यात खरीप आणि रब्बी हंगाम पावसाअभावी वाया गेले. त्यामुळे चाराटंचाई भासणार असे चित्र होते. परंतु चाराटंचाई भासू नये, यासाठी पशुसवंर्धन विभागाने चारा बिणाये शंभर टक्के अनुदानावर वाटप केले.
Fodder Issue
Fodder IssueAgrowon

Sangli News : सांगली जिल्ह्यात खरीप आणि रब्बी हंगाम पावसाअभावी वाया गेले. त्यामुळे चाराटंचाई भासणार असे चित्र होते. परंतु चाराटंचाई भासू नये, यासाठी पशुसवंर्धन विभागाने चारा बिणाये शंभर टक्के अनुदानावर वाटप केले. त्यातच सिंचन योजना सुरू असल्याने शेतकऱ्यांनी चारा लागवड केली आहे. जिल्ह्यात १५ लाख ४३ हजार ५७२ टन इतका चारा उपलब्ध आहे. त्यामुळे जिल्ह्यातील चारा टंचाईचे सावट दूर झाले आहे.

जिल्ह्यात शेतीबरोबरच दुग्ध व्यवसाय केला जातो. दुधाचे अर्थकारण मोठे आहे. जिल्ह्यात १४ लाख ३ हजार ६३३ जनावरांची नोंद आहे. जत तालुक्यात सर्वाधिक जनावरांची संख्या आहे. जल्ह्यातील खरीप आणि रब्बी हंगामातील पिके वाया केली. त्यामुळे वाळका आणि ओला चारा कमी पडणार अशी भीती पशुपालकांच्यात निर्माण झाली होती.

Fodder Issue
Fodder Shortage : पुरंदर, बारामतीत भीषण चाराटंचाई

नोव्‍हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात ११ लाख ८० हजार ३५८ टन चारा उपलब्ध होता. अर्थात हा चारा एक ते दोन महिनेच पुरेल इतका असल्याने सध्या काही प्रमाणात चारा टंचाई निर्माण होऊ लागली आहे. चारा टंचाईवर मात करण्यासाठी कृषी विभाग, पशुसंवर्धन विभागाने नियोजन केले. जिल्ह्यातील ७ हजार २७२ शेतकऱ्यांना ४१ हजार ८१६ किलो चारा बियाणे वाटप केले असून २ हजार २९५ हेक्टरवर पेरणी झाली आहे.

रब्बी हंगामात मका पिकाचीही पेरणी झाली आहे. जिल्ह्यातील ताकारी, म्हैसाळ आणि टेंभू उपसा सिंचन योजना सुरू आहेत. त्यामुळे पाण्याची कमतरता नाही. ज्या भागात योजनांचे पाणी पोहोचले आहे, अशा ठिकाणी चारा पिकाची लागवड शेतकऱ्यांनी केली आहे. जिल्हा पशुसंर्वधन विभागाने प्रतिदिन लहान व मोठ्या जनावरांना किती चारा लागतो आणि चाऱ्याची उपलब्धता आहे.

Fodder Issue
Green Fodder Issue : हिरव्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर, दूध उत्पादनात तब्बल ३० टक्क्यांनी घट

याची माहिती संकलित केली. त्यानुसार मोठ्या जनावरांना प्रतिदिन १५ किलो, तर छोट्या जनावरांना साडेसात किलो चाऱ्याची गरज असते. जिल्ह्यातील १४ लाख जनावरांना दररोज जनावरांना १६ हजार ६६८ टन चारा लागतो. सध्या १५ लाख ४३ हजार ५७२ टन इतका चारा उपलब्ध आहे. त्यामुळे दोन महिन्यांपासून तीन महिन्यांपर्यंत पुरेल इतका चारा शिल्लक आहे.

जिल्ह्यातील तालुकानिहाय जनावरांची संख्या व उपलब्ध चारा

तालुका पशुधन संख्या उपलब्ध चारा (टनांत)

आटपाडी १४९८१७ ६०६६६

जत ३५४७६५ ११६०००

तासगाव १२५३५३ १२९३१३

खानापूर ९६५३२ १३४४६७

कवठेमहांकाळ १४०९९२ २९१२४९

कडेगाव ८१०९८ ८३९९८

मिरज १४३८९३ १८१३६७

पलूस ७३९३१ ८४७९६

शिराळा ८११३५ ६९६७१

वाळवा १५६११७ १७३२११

एकूण १४०३६३३ १५४३५७२

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com