Flood Management : महापूर येऊ नये यासाठी काय उपाययोजना केल्या?

Kolhapur Flood Issue : अलमट्टी धरणाची उंची वाढली तर अलमट्टी धरणात जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात ५१३ मीटरच्या ऐवजी ५१६ मीटर पातळी ठेवता येणार आहे.
Flood Management
Flood ManagementAgrowon
Published on
Updated on

Kolhapur News : महापूर येऊ नये याकरिता काय उपाय योजना केल्या? याचा खुलासा पाटबंधारे खात्याने करावा, अन्यथा महापुरामुळे होणाऱ्या सर्व नुकसानीस पाटबंधारे खाते आणि महाराष्ट्र शासन जबाबदार राहील, असा इशारा अलमट्टी धरणाची उंची वाढ विरोधी सर्वपक्षीय संघर्ष समितीच्या वतीने बुधवारी (ता. १६) देण्यात आला. कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी सहभागी झाले.

अलमट्टी धरणाची उंची वाढली तर अलमट्टी धरणात जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात ५१३ मीटरच्या ऐवजी ५१६ मीटर पातळी ठेवता येणार आहे. ऑगस्ट पहिल्या आठवड्यात ५१९.६० मीटरच्या सध्याच्या उंचीला ५१८ मीटर पर्यंत पाणी पातळी ठेवता येते. पण जर ५२४ मीटरला परवानगी मिळाली तर त्यांना ५२२ मीटरपर्यंत पाणीपातळी ठेवता येते.

Flood Management
Flood Management : कृष्णा-वारणा संभाव्य पूर धोका; जनावरांसाठी चारा छावण्यांचे नियोजन सुरू

आणि ही पातळी जर अलमट्टीमध्ये झाल्यास आणि त्याच दरम्यान सतत पाऊस झाल्यास काय परिस्थिती ओढवेल याचा विचार करूनच अलमट्टीच्या उंचीला आम्ही विरोध करत आहोत. केंद्रीय जल आयोग मान्यताप्राप्त धरण परिचलन आराखड्यानुसार कोयना, वारणा, राधानगरी, तुळशी आणि अलमट्टी धरणाची पाणी पातळी आणि पाणीसाठा केला जात नाही.

Flood Management
Flood Management : चंद्रपूरच्या पूरग्रस्त भागात तत्काळ उपाययोजना करा

केंद्रीय जल आयोगाच्या निर्देशांनुसार ३१ जुलै रोजी या वरील धरणात ५० टक्के पाणीसाठा असणे आवश्यक आहे. पण आज रोजी राधानगरी-८७ टक्के वारणा ७९ टक्के कोयना ७२ टक्के आणि अलमट्टी ९३ टक्के पाणीसाठा करण्यात आला आहे.

खासदार छत्रपती शाहू महाराज, माजी खासदार राजू शेट्टी,विजय देवणे, सर्जेराव पाटील, विक्रांत पाटील-किणीकर,धनाजी चुडमुंगे,व्हि.बी.पाटील, बाबूराव कदम, कॉ. दिलीप पवार, बाबासाहेब देवकर, भारत पाटील-भुयेकर, चंद्रकांत पाटील पाडळीकर, सुभाष शहापुरे, सखाराम चव्हाण, विक्रमसिंह माने, महादेव सुतार, कॉ.चंद्रकांत यादव, पाटबंधारे कोल्हापूर विभागाचे अधीक्षक अभियंता अभिजित म्हेत्रे, सांगली पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता पाटोळे, कार्यकारी अभियंता स्मिता माने, देवकर आदी अधिकारी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com