Solapur News: शेतीमालाची किमान आधारभूत किंमत खरेदी केंद्रांच्या प्रभावी आणि नियमित नियंत्रणासाठी पाच सदस्यीय दक्षता पथकांची नियुक्ती करण्यात येणार आहे. या नियुक्त पथकाचे अध्यक्ष सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी असतील. तसेच निरीक्षण अधिकारी, पुरवठा अधिकारी व गोदाम व्यवस्थापक पथकातील सदस्य असणार आहेत. .धान्य व भरडधान्य खरेदी प्रक्रियेत पारदर्शकता आणि प्रामाणिकता राखणे, किमान आधारभूत किंमत खरेदीच्या निकषांचे पालन होणे, लाभार्थी शेतकऱ्यांना वेळेत व योग्य मोबदला मिळणे सुनिश्चित करणे, तसेच शेतमाल खरेदी प्रक्रियेदरम्यान होणाऱ्या अनियमितता व गैरव्यवहारांना आळा घालणे, ही जबाबदारी या पथकावर राहणार आहे..MSP Procurement Fraud: बनावट कागदपत्रांद्वारे धान बोनस लाटण्याचा प्रकार उघड.शेतीमालाची किमान आधारभूत किंमत खरेदी योजना ही १०० टक्के केंद्रपुरस्कृत योजना आहे. या योजनेअंतर्गत केंद्र शासन निरनिराळ्या पिकांच्या किमान आधारभूत किमती जाहीर करते. आधारभूत किमतीचा लाभ शेतकऱ्यांना होण्याच्या दृष्टीने व त्यांना हमी भावापेक्षा कमी किमतीने (डीस्ट्रेस सेल) धान्य विकावे लागू नये, यासाठी राज्य शासनातर्फे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाकडून केंद्र शासनाने विहित केलेल्या दर्जाच्या धान्याची व भरडधान्याची (ज्वारी, बाजरी, मका व रागी) खरेदी होते..या केंद्रांकडून खरेदी प्रक्रिया व्यवस्थित व सुरळीत होणे, त्यामध्ये सुसूत्रता येणे, योजनेची अधिक पारदर्शकपणे अंमलबजावणी, गुणवत्तेची खात्री, शेतकऱ्यांचे हितसंरक्षण व योजनेप्रती उत्तरदायित्व निश्चिती यासाठी अभिकर्ता संस्था व विभाग तसेच त्यांच्या अंतर्गत कार्यरत खरेदी केंद्रे यांच्यामध्ये प्रभावी समन्वय व नियंत्रण राखणे आवश्यक आहे. दक्षता पथकांचा कालावधी हंगामनिहाय असणार आहे. दक्षता पथकाद्वारे अन्य जिल्ह्यातील खरेदी केंद्रांची तपासणी केली जाईल. जिल्हानिहाय दक्षता पथकांना तपासणीसाठी जिल्ह्यांची निश्चिती शासनस्तरावरून होईल. जिल्ह्यातील पणन अधिकारी/प्रादेशिक व्यवस्थापक जिल्ह्यातील सर्व खरेदी केंद्रांची माहिती दक्षता पथकांस उपलब्ध करून देणार आहेत..Maize MSP Procurement: हमीभावाने मका खरेदीला वेग येईना....अशी आहे पथकाकडील जबाबदारीयोजना राबविताना प्राप्त होणाऱ्या तक्रारींची चौकशी करून त्यासंदर्भात योग्य ती उपाययोजना करणे. अनियमितता टाळण्यासाठी खरेदी केंद्रांची नियमित व प्रभावी तपासणी केली जाणार आहे. शेतकरी नोंदणीसाठी घेतलेले ऑनलाइन ७/१२ उताऱ्यानुसार व प्रत्यक्ष गाव नमुना नंबर १२ (पिकपेरा)ची पीक नोंदणी, शेतकऱ्यांचे आधारकार्ड व त्यांच्या बँक खात्याचा तपशील, शेतकऱ्यांची नोंदणी पीओएस मशिनद्वारे झाल्याची पडताळणी हे पथक करणार आहे..केंद्राकडे आवश्यक मूलभूत साधनसामग्री, ज्यामध्ये मॉयश्चर मीटर, चाळणी, ताडपत्री, इलेक्ट्रॉनिक वजनकाटा, संगणक, स्कॅनर असलेला स्मार्टफोन, प्रशिक्षित कर्मचारी वर्ग आहे का, याची पाहणी करणे ही प्रमुख कामे समिती करणार आहे. या समितीमुळे शेतकऱ्यांना शेतमाल खरेदी प्रक्रियेत पारदर्शकता मिळणार असून त्यांच्या कष्टाला योग्य आणि अधिक मोबदला मिळणार आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.