Dairy Business : इतर जिल्ह्यांतून रायगडमध्ये येते पाच लाख लिटर दूध

Dairy Industry : रायगड जिल्ह्याला दररोज आठ लाख ३० हजार लिटर दुधाची गरज आहे. मात्र केवळ तीन लाख ३८ हजार लिटर दूध उत्पादित होत असल्‍याने सुमारे ५ लाख लिटर दूध पुणे, कोल्हापूर, नगर, गुजरात येथून रायगडमध्ये येते.
Cow Milk
Cow MilkAgrowon
Published on
Updated on

Alibaug News : रायगड जिल्ह्यात कृषी क्षेत्र दिवसेंदिवस कमी होत आहे, त्याचा फटका या क्षेत्रावर अवलंबून असलेल्या कृषिपूरक जोड धंद्याला बसतो आहे. जिल्ह्याला दररोज आठ लाख ३० हजार लिटर दुधाची गरज आहे. मात्र केवळ तीन लाख ३८ हजार लिटर दूध उत्पादित होत असल्‍याने सुमारे ५ लाख लिटर दूध पुणे, कोल्हापूर, नगर, गुजरात येथून रायगडमध्ये येते.

वाढत्‍या औद्योगिकीकरणामुळे कृषी क्षेत्रावर आधारित विविध उद्योगांची घसरण होऊ लागली आहे. कृषी क्षेत्रच कमी झाल्‍याने गुरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. याचा मोठा फटका येथील दुग्ध व्यवसायाला बसला असून मागणीच्या तुलनेत उत्‍पादन कमी होत आहे. रायगड जिल्ह्याची एकेकाळी भाताचे कोठार अशी ओळख होती.

Cow Milk
Milk Rate : शासनाच्या आदेशाची होळी ! दूध दरावरून रयत क्रांती संघटना आक्रमक

शेतीला जोड म्हणून दूधदुभती जनावरे पाळली जायची. गेल्या काही वर्षात जिल्ह्यात औद्योगिकरण वाढले आहे. मोठमोठ्या औद्योगिक वसाहती जिल्ह्यात निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे शेती क्षेत्र कमी झाले आहे. शेती कमी झाल्याने हिरवा चारा उपलब्धता कमी झाली आहे. यामुळे जिल्ह्यातील दुग्ध व्यवसायही घटले आहे. कृषी व्यवसायाशी निगडित जोडव्यवसाय कमी झाले आहेत.

Cow Milk
Milk Rate : कुठे रस्त्यावर दूध ओतून, कुठे शासन आदेशाची होळी, तर कुठे दुग्धाभिषेक', सरकारविरोधात शेतकरी आक्रमक

१८ दूध उत्पादक सहकारी संस्था

दूध उत्पादन वाढीसाठी सहकारी संस्था चांगले काम करतात. यासाठी राज्य सरकारकडून काही सवलतीही संस्थांना दिल्या जातात. प्रत्येक जिल्ह्यात या साठी वेगळ्या कार्यालयाची निर्मिती केली आहे. परंतु रायगड जिल्ह्यात या कार्यालयाचे काम बसण्यात जमा आहे. जिल्ह्यात दुग्ध संकलन करणाऱ्या नोंदणीकृत १३५ सहकारी संस्था आहेत. त्यातील १८ कार्यरत असून त्यांच्याकडून १५७३ प्रतिदिन दूध संकलन होते. यात अवसायानात निघालेल्या ११७ संस्था आहेत.

रायगड जिल्ह्यात दिवसेंदिवस औद्योगिकरण वाढत असून शेती क्षेत्र कमी होत आहे. त्यामुळे जनावरांना आवश्यक हिरवा चाऱ्याचे प्रमाण कमी आहे. पोषक वातावरण व मुबलक हिरवा चारा यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील जनावरांची दूध उत्पादकता जास्त आहे. रायगड जिल्ह्यात शेतकरी अल्पभूधारक असून दुग्ध व्यवसायात मोठी गुंतवणूक करावी लागते. या सर्वांचा परिणाम दुग्ध उत्पादनावर होत आहे.
सुदर्शन पाडावे, प्रभारी अधिकारी, जिल्हा दुग्ध व्यवसाय विकास विभाग

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com