
Buldana News : राज्यात सर्वसमावेशक पीकविमा योजनेत १ रुपया भरून शेतकरी पीकविमा योजनेत सहभागी होत आहेत. जिल्ह्यात ५,३५,५१७ अर्ज दाखल झाले आहेत. या हंगामात शनिवार (ता. १३) पर्यंत ४ लाख ८ हजार ६०६ हेक्टर क्षेत्र विमा संरक्षणाखाली आले आहे.
खरीप हंगाम २०२४ मध्ये पीकविमा योजनेत सहभागी होण्यासाठी आता एक दिवस राहिली आहे. अधिसूचित केलेल्या पिकांचा विमा शेतकऱ्यांना भरता येत आहे. शेतकऱ्यांना केवळ १ रुपया भरून या योजनेत सहभागी होता येत आहे. त्यासाठी पीएमएफबीवाय पोर्टलवर स्वत: शेतकऱ्यांना, तसेच बँक, विमा कंपनी प्रतिनिधी व सामूहिक सेवा केंद्र अर्थात सीएससीमार्फत अर्ज करता येत आहे.
परंतु, काही सीएससीधारक शेतकऱ्यांना अतिरिक्त पैसे घेत असल्याच्या तक्रारी कृषी विभागाकडे येत आहेत. तथापि, सीएसएसी केंद्र चालकांना पीकविमा अर्ज भरण्यासाठी प्रति अर्ज ४० रुपये अदा केले जात आहेत. त्यामुळे जादा पैसे घेत जात असतील तर संबंधित शेतकऱ्यांनी थेट टोल फ्री क्रमांक अथवा प्रत्यक्ष संपर्क साधून तक्रार करावी, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
सीएससीला कंपनीकडून मिळतात ४० रुपये
पीकविमा योजनेत शेतकऱ्यांकडून १ रुपया रक्कम घेऊन त्यांची नोंदणी करण्यासाठी पीकविमा कंपनीकडून प्रती अर्ज ४० रुपये एवढा मोबदला सीएससी धारकाला देण्यात येतो. त्यामुळे त्यांना अतिरिक्त पैसे देण्याची आवश्यकता नाही. त्याबाबत दर्शनी भागात फलक लावण्याचे निर्देश देण्यात आले असून अतिरिक्त रक्कम घेतले जात असल्याची तक्रार शेतकरी किंवा शासनाकडून प्राप्त झाल्यास कडक कारवाई करून संबंधित सीएससीचा आयडी बंद केला जाणार आहे.
कुठे कराल तक्रार
सर्व समावेशक पीकविमा योजनेत सहभागासाठी एक रुपयांपेक्षा अधिक रक्कम मागितल्यास अशा सीएससीधारकांची टोल फ्री क्रमांक १४४११, १८००१८००४१७ या टोल फ्री क्रमांकावर तसेच ९०८२९२१९४८ या व्हॉट्सॲपवर तक्रार करावी, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
तालुक्यातील अर्ज संख्या
बुलडाणा २३,५५६
चिखली ३५,५४४
देऊळगाव राजा १५,६८९
जळगाव जामोद १३,२३८
खामगाव १५,८१६
लोणार २०,२१०
मलकापूर ५८४२
मेहकर ३२,१७६
मोताळा ८३७५
नांदुरा ११,८०२
संग्रामपूर १६,०३०
शेगाव ११,६२०
सिंदखेड राजा ३२,४४५
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.