Young Voter : अमरावती जिल्ह्यात साडेपाच लाख तरुण मतदार

Voter List Update : आगामी विधानसभेच्या निवडणुकांसाठी अमरावती जिल्ह्यातील आठही मतदारसंघांची संयुक्त अंतिम मतदारयादी जाहीर करण्यात आली.
Voter Registration
Voter RegistrationAgrowon
Published on
Updated on

Amaravati News : आगामी विधानसभेच्या निवडणुकांसाठी अमरावती जिल्ह्यातील आठही मतदारसंघांची संयुक्त अंतिम मतदारयादी जाहीर करण्यात आली. यामध्ये तरुण मतदारांची संख्या लक्षणीय असून ५ लाख ५६ हजार ८२२ मतदार या यादीत समाविष्ट आहेत. तर ३८ हजार ८३३ नवमतदारांचा व १६ हजार ७९६ दिव्यांग मतदारांचा समावेश या यादीत आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर निवडणूक आयोगाने मतदारयादी पुनर्रिक्षण कार्यक्रम लावला होता. याअंतर्गत २५ लाख ३ हजार ८८४ मतदारांची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.

Voter Registration
Voter List : सांगली जिल्ह्यात प्रारूप मतदार यादीवर १६ हरकती

वयोगटानुसार मतदार यादीत ३० ते ३९ या वयोगटातील पाच लाख ५६ हजार ८२२ तरुण मतदारांचा समावेश आहे. तर, १८ ते १९ वयोगटातील ३८ हजार ८३३ मतदार प्रथमच मतदान करणार आहेत. १६ हजार ७९६ दिव्यांग मतदार मतदानात सहभागी होणार आहेत. मतदार यादी पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत राबविण्यात आलेल्या मोहिमेत ६ ऑगस्टला प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आल्यानंतर आक्षेप व हरकतींची सुनावणी पार पडली.

प्रारूप मतदार यादीत ४९ हजार ३९ मतदार वाढले आहेत. एकूण २५ लाख ३ हजार ८८४ मतदार संख्येत १२ लाख ७७ हजार ३५८ पुरुष व १२ लाख २६ हजार ४३२ महिला मतदारांचा समावेश असून ९४ इतर मतदार आहे.

Voter Registration
Voter List Update : सोलापूर जिल्ह्यात ७५ हजार मतदार वाढले

८० वर्षांवरील ७६ हजार ९८० मतदार

यंदा पहिल्यांदाच लोकसभेमध्ये ८० वर्षावरील मतदारांना घरी बसूनच मतदानाची सुविधा आयोगाच्या वतीने केली होती. विधानसभेत देखील या वयोवृद्ध मतदारांना घरी बसून मतदान करण्याची सुविधा मिळण्याची शक्यता आहे. या अंतिम मतदार यादीत ७६ हजार ९८० मतदारांची नोंदणी आहे.

महिला मतदारांची संख्या वाढली

जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीदरम्यान प्रसिद्ध झालेल्या मतदार यादीमध्ये स्त्री-पुरुष गुणोत्तर ९४३ इतके होते. तर विधानसभा निवडणुकीसाठी प्रसिद्ध झालेल्या अंतिम मतदार यादीमध्ये स्त्री-पुरुष गुणोत्तर ९६० इतके झालेले आहे. यावरुन सदर पुनर्रिक्षण कार्यक्रमामध्ये पुरुष मतदारांच्या तुलनेत स्त्री मतदारांची नाव नोंदणी अधिक झाल्याचे दिसून आले आहे. जिल्ह्यात पुरुषाच्या तुलनेत अंतिम यादीत १२ हजार ६०० महिला मतदार वाढले आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com