Fishing
Fishing Agrowon

Fishing Season : वाऱ्यामुळे मच्छीमार संकटात

Fisheries : मासेमारीचा नवीन हंगाम नुकताच सुरू झाला होता. यंदा जाळ्यात चांगली मासळीही मिळत होती.
Published on

Virar News : मासेमारीचा नवीन हंगाम नुकताच सुरू झाला होता. यंदा जाळ्यात चांगली मासळीही मिळत होती. रावस, सुरमई, पापलेट, बोंबील मिळत असतानाच पुन्हा एकदा निसर्गाने मच्छीमारांवर अवकृपा दाखवून त्यांच्या तोंडचा घास हिरावून नेला आहे. गेल्या आठ दिवसांपासून समुद्रात घोंगावणाऱ्या वाऱ्यामुळे मच्छीमारांचे नुकसान झाले आहे.

१५ ऑगस्टपासून मच्छीमारी पुन्हा सुरू झाल्याने कोळी लोकांमध्ये आनंद होता. जवळपास दोन महिने घरी बसून काढल्यावर आता कुठे दोन पैसे हाती लागतील, असे वाटतच असताना समुद्रात वादळी वारे वाहू लागल्याने बोटींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यातच मासळी पकडण्याची जाळीही फाटली.

Fishing
Fish Market : म्हाकुळ माशाच्या दरात घट

मागील हंगामाच्या शेवटी आणि हिवाळ्यात मच्छीमारी बोटी समुद्रात गेल्यानंतरही मासळी मिळाली नव्हती. चार दिवसांपासून बोटी किनाऱ्यावर असून उद्या (ता. ३०)पर्यंत थांबणार आहेत. पुढे वादळ कायम राहिले, तर आणखीन काही दिवस बोटी किनाऱ्यावरच राहण्याची शक्यता आहे.

Fishing
Fish Production : मत्स्य उत्पादनात महिलांचा सहभाग वाढविण्यावर सरकारचा जोर

मासळीचे ठिकाण बदलण्याचा अंदाज

वादळी वाऱ्यानंतर समुद्रात झालेल्या हालचालींमुळे मासळी घाबरून प्रवाहासोबत अन्य ठिकाणी फेकली जाते. त्यामुळे समुद्रात मासळी दुष्काळ पडतो. या वादळानंतरदेखील मासळी दुष्काळ पडण्याची भीती मच्छीमारांमध्ये असल्याचे नायगावचे माजी सरपंच निवृत्ती घुसेकर यांनी सांगितले.

दर्जानुसार पापलेटच्या किमती

गेल्या वर्षीचा भाव आताचा भाव

सुपर १४०० १६००

नंबर १ ११५० १२५०

नंबर २ ९५० ९९०

नंबर ३ ७५० ७७५

नंबर ४ ४०० ५०५

काफरी नंबर १ १२०० १२५०

नंबर २ १००० ९५०

नंबर ३ ६०० ६५०

नव्या हंगामात चांगली मच्छी मिळत असताना अचानक आलेल्या वादळाचा फटका बसला. त्यामळे बऱ्याच वर्षांनी मिळालेले पापलेटचे धन समुद्रात सोडून मच्छीमारांना परत यावे लागले. पापलेट आणि इतर मच्छी मिळत असल्याने असलेले कर्ज अथवा दोन घास हाताशी येण्याचे दिसत होते, परंतु वादळामुळे ते स्वप्न भंगले आहे. सरकारने याची दखल घेत मच्छीमारांना मदतीचा हात द्यावा.
- बर्नाड डिमेलो, कार्याध्यक्ष, अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समिती

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com