Fish Production : पारदर्शकपणे काम करून मत्स्योत्पादनात वाढ करा

Fisheries Business : मत्स्यव्यवसायाला आता शेतीचा दर्जा मिळाला आहे. त्यामुळे आता मासेमार बांधवांचे जीवनमान उंचावले पाहिजे. मराठवाड्यात मत्स्योत्पादन वाढीला वाव आहे.
Fishing
FishingAgrowon
Published on
Updated on

Dharashiv News : मत्स्यव्यवसायाला आता शेतीचा दर्जा मिळाला आहे. त्यामुळे आता मासेमार बांधवांचे जीवनमान उंचावले पाहिजे. मराठवाड्यात मत्स्योत्पादन वाढीला वाव आहे. त्यासाठी विभागाने मत्स्योत्पादन वाढीसाठी नियोजनातून पारदर्शक आणि प्रामाणिकपणे काम करावे, असे निर्देश मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नीतेश राणे यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात शनिवारी (ता. सात) लातूर मत्स्यव्यवसाय विभागाचा आढावा घेताना ते बोलत होते. जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मैनाक घोष, पोलिस अधीक्षक रितू खोकर, लातूर मत्स्यव्यवसाय विभागाचे प्रादेशिक उपायुक्त शिरीष गाताडे व छत्रपती संभाजीनगरचे प्रादेशिक उपायुक्त विजय शिखरे या वेळी उपस्थिती होते.

श्री. राणे म्हणाले, की मत्स्योत्पादनासाठी तलाव ठेक्याने देताना पारदर्शकता असली पाहिजे. अनेक मासेमारी तलावात गाळ साचलेला आहे. तो गाळ काढण्याचा निर्णय पावसाळा संपल्यानंतर घेण्यात येईल. मासेमारी बांधवांचे पीक कर्जासाठी किसान क्रेडिट कार्ड काढण्यासाठी प्रशासनाने जिल्हास्तरीय बँकांच्या बैठकीत बँकांना उद्दिष्ट द्यावे. मासेमारी तलावांवर असलेल्या अतिक्रमण काढण्यात यावे.

Fishing
Maharashtra Fisheries: मत्स्य व्यवसायाला ‘कृषी’चा दर्जा

यासाठी पोलिसांची मदत घेण्यात येईल. या वेळी आढावा मत्स्यव्यवसाय विभागाच्या सहायक आयुक्त तेजस्विनी करळे (लातूर), जे.एस.पटेल (धाराशिव), विक्रम कच्छवे (नांदेड), भास्कर सानप (बीड), अजित सुरवसे (परभणी), डॉ. मधुरिमा जाधव (छत्रपती संभाजीनगर), मत्स्य व्यवसाय अधिकारी ए.एस.मुसळे (लातूर), ए. डी. देवकते (धाराशिव) यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

ठेके देताना वशिलेबाजी नको

वशिलेबाजीने तलावांचे ठेके देऊ नका, असे सांगून श्री.राणे म्हणाले, त्यांना स्पर्धेत उतरायला लावून योग्य संस्थांची निवड मासेमारी तलावासाठी झाले पाहिजे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात मत्स्य उत्पादन होण्यास मदत होईल. मत्स्यबीज संवर्धन केंद्रातून मोठ्या प्रमाणात मत्स्यबीजांचे उत्पादन घ्यावे. मत्स्यबीजांचे उत्पादन वाढले तरच मत्स्य उत्पादनात वाढ होईल.

चिलापिया माशांचे उत्पादन बंद झाले पाहिजे, याची दक्षता मत्स्यव्यवसाय विभागाने घ्यावी. चिलापिया या माशामुळे अन्य देशी माशांचे नुकसान होत आहे. चिलापिया माशांवर बंदी आणण्यासाठी वरिष्ठांशी पत्रव्यवहार करण्यात येईल, असे राणे यांनी सांगितले. जिल्ह्यातील मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थांच्या सभासदांना किसान क्रेडिट कार्ड काढण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे श्री. पुजार यांनी सांगितले.

Fishing
Fisheries Business : मत्स्य क्षेत्रातील सहकारी संस्थांची भूमिका महत्त्वाची...

लातूर विभागातून २८ हजार टन मत्स्योत्पादन

लातूर विभागात १ हजार हेक्टरवरील ४ तलाव, ५०० ते १ हजार हेक्टरचे ३ तलाव, ५०० हेक्टरवरील ५०९ तलाव असे एकूण ५१६ तलाव असून या पाटबंधारे तलावांचे जलक्षेत्र ३८ हजार हेक्टर आहे. मार्चअखेर या तलावातून २५ हजार ३९३ मेट्रीक टन मत्स्योत्पादन घेण्यात आले. प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेतून २ हजार ७७५ मे.टन माशांचे उत्पादन घेण्यात आले.

विभागात ५०१ मत्स्यव्यवसाय सहकारी संस्था असून या संस्थांचे १८ हजार ३ सभासद आहेत. शासकीय मत्स्यबीज केंद्रातून मार्चपर्यंत १ हजार २२६ .५० लक्ष मत्स्यबीजांचे उत्पादन घेण्यात आले. विभागातंर्गत येणाऱ्या लातूर, धाराशिव,नांदेड व हिंगोली जिल्ह्यात तीन वर्षात तलावातून २८ हजार १६८ टन मत्स्योत्पादन घेण्यात आले. ४९३ तलाव ठेकेदारी पद्धतीने दिले असून या तलावातून प्रत्यक्षात ४५ कोटी ५५ लक्ष २४६ रुपये इतका महसुल प्राप्त झाल्याची माहिती श्री. गाताडे यांनी दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com