
Raigad News : : रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन येथे स्वतंत्र मत्स्यव्यवसाय विद्यापीठाची स्थापना करण्याच्या मागणीने आता जोर धरला आहे. तालुक्यातील मच्छीमारांच्या हितासाठी हे विद्यापीठ कसे उपयुक्त ठरेल, यावर स्थानिक मच्छीमार आणि विविध संघटना भर देत आहेत.
सागरपुत्र संघटन, अखिल भारतीय मत्स्यप्रवर्तक संघाचे पांडुरंग दामोदर चौले यांनी याबाबत मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले आहे. श्रीवर्धनमध्ये मत्स्यव्यवसायाशी संबंधित कौशल्य विकासासाठी ११ हेक्टर जमीन आधीच हस्तांतरित करण्यात आली आहे, मात्र त्यासाठीची कोणतीही कार्यवाही सुरू नसल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.
महाराष्ट्रात सध्या नागपूर येथील महाराष्ट्र पशु आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठ, हे एकमेव समर्पित राज्यस्तरीय मत्स्य विद्यापीठ आहे. याव्यतिरिक्त, पाच ते आठ मत्स्य महाविद्यालये आहेत, मात्र सध्याच्या सर्व विद्यापीठात मिश्र स्वरूपाचे शिक्षण देण्यात येत आहे.
त्यामुळे सागरी मच्छीमार व्यावसायिक आपल्या मुलांना पुढील शिक्षणासाठी परदेशात पाठवणे पसंत करतात, अशी खंत चौले यांनी व्यक्त केली आहे. अन्य राज्यात मत्स्यव्यवसाय विद्यापीठे असली तरी, महाराष्ट्रीयन तरुणांना तेथे संधी मिळत नाहीत.
श्रीवर्धन हे कोकण किनारपट्टीवर सर्व सुविधांनी युक्त, असे महत्त्वाचे मासेमारी बंदर आहे. येथे मासेमारी उद्योग आणि अनेक मच्छीमार संस्था आहेत. संपूर्ण किनारपट्टीवर मच्छीमारांच्या वसाहती कायमस्वरूपी आहेत.
विद्यापीठासाठी महत्त्वाची सूचना
नियोजन व मूल्यांकन : ध्येय निश्चित करून विश्लेषण करणे,
मंजुरी व जमीन संपादन : सरकारी मान्यता मिळवून जमीन ताब्यात घेणे, पायाभूत सुविधा विकास : इमारती, प्रयोगशाळा आणि संशोधन सुविधा उभारणे, मनुष्यबळ व अभ्यासक्रम : प्राध्यापक-कर्मचारी भरती करून करणे,
शैक्षणिक सुरुवात : प्रत्यक्षात अध्यापनाला प्रारंभ करणे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.