
Nirgudsar News : निरगुडसर येथील थोरात मळा नजीक असलेल्या रासायनिक व खते, कीटकनाशक विक्रेते नवनाथ आनंदराव थोरात यांच्या बिरोबा ॲग्रो सर्व्हिसेस या दुकानाला रविवारी (ता.१५) रात्री साडेआठच्या सुमारास अचानक वाढलेल्या विद्युत दावामुळे शॉर्टसर्किट होऊन लागलेल्या आगीत दुकानातील फर्निचरसह सीसीटीव्ही कॅमेरे, संगणक जळून खाक झाले. यात सुमारे दीड लाखाचे नुकसान झाले आहे.
गेल्या दोन महिन्यांत निरगुडसर परिसरातील पाचवी ते सहावी घटना आहे. सुदैवाने या सर्व घटनांत कुठलीही जीवितहानी झाली. किंवा जखमी झाले नाही. परंतु यामुळे महावितरणच्या कारभारावर पुन्हा एकदा प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.
मंचर-पारगाव रस्त्यावर बिरोबा मंदिराजवळ बिरोबा ॲग्रो सर्व्हिसेस या दुकानातील कामावर असलेला मुलगा रविवारी रात्री आठ वाजता दुकान बंद करून घरी गेला. त्यानंतर साडेआठच्या सुमारास विजय मेंगडे यांनी फोनद्वारे दुकानातून धूर निघत असल्याचे सांगितले. सुरुवातीला महावितरणच्या कार्यालयातून वीजपुरवठा खंडित करून स्थानिक नागरिकांच्या मदतीने ही आग विझवली. तोपर्यंत साहित्य जळाल्याने दीड लाख रुपयांचे नुकसान झाले.
सलग पाचवी घटना
निरगुडसर परिसरात गेल्या दोन महिन्यांपासून ही पाचवी ते सहावी घटना आहे महावितरणच्या अचानक वाढत्या विद्युत दाबामुळे या घटना घडल्या आहेत. यामध्ये नागरिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.महावितरणच्या कारभारामुळे वारंवार घडत असल्याच्या प्रतिक्रिया या वेळी स्थानिक नागरिकांनी दिल्या तरी महावितरणने या बाबत आवश्यक ती कार्यवाही करणे गरजेचे आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.