Farmer Issue : समाधानकारक दराअभावी शेतकऱ्यांपुढे आर्थिक संकट

Market Update : कांदा, बटाट्यासह सर्वच भाजीपाला पिकांना ऐन उन्हाळ्यातही समाधानकारक बाजारभाव नसल्याने बागायतदार शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.
Vegetables
VegetablesAgrowon

Junnar News : ओतूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपबाजारात कांदा बटाट्यासह पालेभाज्यांची ही मोठी आवक होत आहे. कांदा, बटाट्यासह सर्वच भाजीपाला पिकांना ऐन उन्हाळ्यातही समाधानकारक बाजारभाव नसल्याने बागायतदार शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.

शेतीमालास चांगली किमत न मिळाल्याने बागायतदार शेतकरी (Farmer) शेती करूनही कर्जबाजारी होऊन लागला आहे. शासनाने शेतीविषयी योग्य धोरण अवलंबून शेतकऱ्यांच्या सर्वच पिकांना उत्पादन खर्च व दीडपट नफा असा उत्पादन खर्चावर आधारित हमीभाव द्यावा, अशी मागणी सर्व शेतकरी वर्गातून होत आहे.

Vegetables
Market Price Vegetables : आंबा, वांगी, लसणाने बाजारपेठ फुलली, कसा आहे भाजीपाला दर?

ओतूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपबाजारात कांद्याची १४ हजार ७७४ पिशव्यांची आवक झाली असून, त्यास प्रतवारी नुसार प्रतिदहा किलोला गोळा कांदा १४० ते १७०, सुपर कांदा १०० ते १५०, गोल्टी ३० ते १००, बदला कांदा २० ते ८० असा बाजारभाव मिळाला आहे

Vegetables
Mango Season : हापूसच्या दरात किंचितशी घट

तर बटाटा आवक २४५ पिशवी झाली असून, त्यास १०० ते २५० रुपयापर्यंत प्रतिदहा किलोला बाजारभाव मिळाला आहे, असे जुन्नर बाजार समितीचे सभापती संजय काळे, संचालक तुषार थोरात व ओतूर उपबाजाराचे व्यवस्थापक दीपक मस्करे यांनी दिली.

ओतूर येथील उपबाजारात गुरुवार सोडून इतर सर्व दिवस भाजीपाल्याचे लिलाव होतात. ओतूर व परिसरातील शेतकरी ऐन उन्हाळ्यात चार पैसे मिळतील या आशेवर उन्हाळात भाजीपाल्याचे पीक घेतात. मात्र या वर्षी भाजीपाल्यातील अपवादात्मक एक-दोन वाण सोडले तर सर्वच भाज्यांना समाधानकारक बाजारभाव मिळत नाही.
प्रशांत डुंबरे, प्रगतिशील शेतकरी, उपसरपंच, ओतूर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com