Ginger Procurement : सरसकट आले खरेदीचे अखेर राज्य शासनाकडून परिपत्रक

Circular from State Government : शेतकरी व इतर घटकांकडून बाजार आवार आणि शेताच्या बांधावर आल्याची खरेदी करताना ती परंपरागत सरसकट पद्धतीनेच खरेदी करावी.
Ginger Procurement
Ginger ProcurementAgrowon
Published on
Updated on

Satara News : शेतकरी व इतर घटकांकडून बाजार आवार आणि शेताच्या बांधावर आल्याची खरेदी करताना ती परंपरागत सरसकट पद्धतीनेच खरेदी करावी, अशा सूचना सर्व शेती उत्पन्न बाजार समित्यांनी आपल्याकडील अधिकृत परवानाधारक व्यापारी व अडत्यांना कराव्यात, नवीन व जुने आले वेगळे आणण्याचा आग्रह धरू नये, असे परिपत्रक राज्याच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग, पणन संचालनालयाने काढले आहे.

राज्यात वर्षानुवर्षे प्रतवारी न करता सुरू असलेली आले खरेदी बंद करण्याचा घाट व्यापाऱ्यांनी घातला आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडू लागले आहेत. याप्रश्नी महाराष्ट्र शासनाकडून उचित कार्यवाही व्हावी, अशा आशयाचे निवेदन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी पणनमंत्री अब्दुल सत्तार यांना सादर केले होते.

Ginger Procurement
Ginger Market : आले पिकाच्या दरात घट

त्यावर श्री. सत्तार यांनी ३० जुलै रोजी सिल्लोड येथे बैठक आयोजित केली. बैठकीतील चर्चेनंतर सहकार आणि पणन विभागाने परिपत्रक काढले आहे. त्यात म्हटले आहे, की शेतकरी व इतर घटकांकडून बाजार समिती आवारात येणाऱ्या आल्याची खरेदी करताना ती सरसकट पद्धतीने खरेदी करावी, तसेच नवे-जुने आले वेगळे आणण्याचा आग्रह धरू नये.

Ginger Procurement
Ginger Market Deals : आले उत्पादक, व्यापाऱ्यांशी चर्चेतून तोडग्याचा प्रयत्न

व्यवहार झाल्यानंतर त्याची सौदापट्टी करावी व त्यावर दर कसा देण्यात आला आहे, याचा स्पष्ट उल्लेख बिलावर करावा. जे व्यापारी शेतकऱ्यांच्या बांधावर आले खरेदी करतात, त्यांनीही नवे-जुने आले असा वेगळा आग्रह धरू नये. बाजार समित्यांनी आल्यास योग्य भाव मिळवून देण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न व उपाययोजना कराव्यात. या परिपत्रकीय सूचनांचे काटेकोरपणे पालन होईल, याची दक्षता घ्यावी, असेही नमूद केले आहे.

‘स्वाभिमानी’च्या लढ्याला यश

दरम्यान, राज्यातील आले उत्पादकांवरील अन्यायाविरुद्ध स्वाभिमानी शेतकरी संघटनेने माजी खासदार व संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी, राज्य प्रवक्ते अनिल पवार, सातारा जिल्हाध्यक्ष राजू शेळके, आले उत्पादकांचे प्रतिनिधी म्हणून कोरेगाव बाजार समिती सभापती ॲड. पांडुरंग भोसले, दिनेश बर्गे व त्यांचे सहकारी, ‘स्वाभिमानी’सह विविध पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते, शेतकरी हितासाठी पुढे आलेली कोरेगाव व सातारा बाजार समिती व आले उत्पादक शेतकऱ्यांनी सहभागी होऊन शेवटपर्यंत लढा दिला व या लढ्याला यश आले आहे, असे पत्रक ‘स्वाभिमानी’ने प्रसिद्धीस दिले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com