Bhaktimarg Highway : भक्तिमार्ग रद्द करण्याच्या मागणीसाठी शेतकरी चढले टॉवरवर

Land Acquisition : प्रस्तावित सिंदखेडराजा-शेगाव महामार्ग रद्द करावा, या मागणीसाठी महामार्ग बाधित शेतकऱ्यांनी जिवाची पर्वा न करता मंगळवारी (ता. ६) टॉवरवर चढून आंदोलन केले.
Bhaktimarg Highway Protest
Bhaktimarg Highway ProtestAgrowon
Published on
Updated on

Buldana News : प्रस्तावित सिंदखेडराजा-शेगाव महामार्ग रद्द करावा, या मागणीसाठी महामार्ग बाधित शेतकऱ्यांनी जिवाची पर्वा न करता मंगळवारी (ता. ६) टॉवरवर चढून आंदोलन केले. या माध्यमातून सरकार आणि प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला. या वेळी शेकडोंच्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. चिखली तालुक्यातील करतवाडी घानमोडी मानमोडी परिसरात हे आंदोलन झाले.

सिंदखेडराजा-शेगाव भक्तिमार्ग रद्द करण्यासाठी शेतकरी गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने पाठपुरावा करीत आहेत. परंतु याची कुठलीही दखल न घेता शासनस्तरावरून या मार्गाचे काम पुढे नेले जात आहे. त्यामुळे याला विरोध दर्शवीत मंगळवारी तरुण शेतकऱ्यांनी महामार्गविरोधी घोषणा देत टॉवरवर चढून लक्ष्यवेधी आंदोलन केले. या वेळी टॉवरखाली परिसरातील शेकडो महामार्ग बाधित शेतकरी एकत्र आले होते.

Bhaktimarg Highway Protest
Shaktipeeth Project : ‘शक्तिपीठ’ प्रकल्प रेटल्यास सरकारला फिरणे कठीण करू

सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या आमदारांनी विधानसभा अधिवेशनात हा महामार्ग रद्द करावा ही मागणी रेटून धरली. त्यावर सरकारकडून काहीही प्रतिसाद मिळाला नसल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. पाच महिन्यांपासून वेगवेगळी आंदोलने होत आहेत. तरीही सरकार शेतकऱ्यांच्या भावना समजून घेत नसेल, शेती हिसकावून घेतली जात असेल तर जगायचे तरी कशासाठी हा संतापजनक सवाल शेतकरी विचारत आहेत.

Bhaktimarg Highway Protest
Shaktipeeth Highway : शक्तिपीठ महामार्ग रद्द करा

महामार्ग विरोधी कृती समितीच्या वतीने सरकारला याआधी निवेदने दिलेली आहेत. शेतकऱ्यांनी उपविभागीय महसूल अधिकाऱ्यांकडे आक्षेप, हरकती नोंदवल्या. स्थानिक आमदार, खासदारापासून मुख्यमंत्र्यांपर्यंत महामार्ग रद्द करण्याची मागणी केली. प्रत्येक ठिकाणी महामार्ग रद्द करू, असे आश्‍वासनही मिळाले. प्रत्यक्षात मात्र कागदोपत्री महामार्ग करण्याची कारवाई सुरूच आहे. त्यामुळे शेतकरी संभ्रमात पडले आहेत. आंदोलकांना टॉवरवरून खाली उतरवण्यासाठी महामार्ग कृती समितीचे निमंत्रक डॉ. सत्येंद्र भुसारी, डॉ. ज्योतीताई खेडेकर, शिवनारायण म्हस्के यांनी विनंती केली.

शिवसेनेचे संपर्कप्रमुख प्रा. नरेंद्र खेडेकर, अशोकराव पडघान, तालुकाप्रमुख किसन धोंडगे, युवासेना जिल्हा प्रमुख नंदू कऱ्हाडे, संतोष वाकडे, गजानन पवार, राजू भोसले, नारायण जंजाळ, संजय शेळके आदी सामाजिक, राजकीय कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी समजूत काढली व आंदोलनकर्त्यांना खाली उतरवले. या वेळी प्रदीप जाधव, समाधान म्हस्के, सागर अंभोरे, सतीश म्हस्के, मदन दायजे, अक्षय वाघ, गजानन म्हस्के, रमेश म्हळसणे, मनोहर म्हळसणे, विठ्ठल माघारी, सुरेश पिंगळे, गजानन धांडगे, मोहन म्हळसणे आदी शेतकरीपुत्र टॉवरवर चढले होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com