Market Committee Election : सांगली बाजार समिती सभापतिपदासाठी 'फिल्डिंग'

Sangli APMC Election update : सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने एकतर्फी बाजी मारली आहे.
Sangli APMC Election News
Sangli APMC Election NewsAgrowon

Sangli Market Committee News : सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने एकतर्फी बाजी मारली आहे. सभापतिपदासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यामुळे इच्छुकांनी सभापती पदासाठी नेत्यांकडे फिल्डिंग लावली आहे.

बाजार समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला भाजप पॅनेलचा दारुण पराभव करण्यात यश आले.

निवडून आलेल्या पंधरा संचालकांपैकी काँग्रेसचे सर्वाधिक सात संचालक असल्याने पहिल्यांदा संधी मिळविण्यासाठी प्रयत्नशील आहेत. राष्ट्रवादीकडे त्यापाठोपाठ सहा संचालक असल्याने त्यांच्याकडून सभापतीसाठी फिल्डिंग लावण्यात येत आहे.

काँग्रेस जिल्हाध्यक्ष आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या गटाचे सुजय शिंदे प्रमुख दावेदार मानले जातात. पहिल्या टप्प्यात जतला संधी देण्याचा विचार झाल्यास त्यांच्या गळ्यात सभापतिपदाची माळ पडू शकते.

Sangli APMC Election News
Sangli Apmc Voting : सांगलीत चुरशीने ९३.४५ टक्के मतदान, उमेदवारांची प्रतिष्ठा पणाला

मिरज तालुक्यातील संग्राम पाटील कुटुंबातीलच असल्यामुळे पहिल्या टप्प्यात त्यांना संधी मिळण्याची शक्यता कमी आहे; पण ते अभ्यासू असल्यामुळे कार्यकर्त्यांचा दबाव वाढल्यास त्यांनाही सभापतिपदाची संधी मिळू शकते.

ऐनवेळी उमेदवारी मिळवून यशस्वी झालेले एरंडोलीचे बाबगोंडा पाटील काँग्रेस पक्षाचे एकनिष्ठ असल्यामुळे त्यांच्या नावाचा सभापतिपदासाठी विचार होऊ शकतो.

काँग्रेसकडून या नावांची चर्चा

काँग्रेसकडून जतचे सुजय शिंदे, मिरजेतून संग्राम पाटील, बाबगोंडा पाटील प्रमुख दावेदार मानले जातात. राष्ट्रवादीकडून रमेश पाटील, आनंदराव नलवडे यांच्या नावांची चर्चा आहे.

उपसभापतीसाठीही चुरस....

पहिल्या टप्प्यात सभापतिपद काँग्रेसकडे गेल्यास उपसभापतिपदासाठी चुरस निर्माण होण्याची शक्यता आहे. उपसभापतिपद राष्ट्रवादी किंवा माजी मंत्री घोरपडे गटाकडे येऊ शकते; परंतु राष्ट्रवादी सभापतिपदासाठी आग्रही आहे. त्यामुळे घोरपडे गटाला संधी मिळू शकते. जत, कवठेमहांकाळ व मिरज तालुक्यांतून अनेक इच्छुक आहेत. सभापतिपद जतला दिल्यास उपसभापतिपदाची संधी मिरज किंवा कवठेमहांकाळला मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com