Sangli Apmc Voting : सांगलीत चुरशीने ९३.४५ टक्के मतदान, उमेदवारांची प्रतिष्ठा पणाला

सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी दुपारी बारापर्यंत ४१.५७ टक्के मतदान झाले होते.
 Election
ElectionAgrowon
Published on
Updated on

Sangli News : सांगली येथील कृषी उत्पन्न बाजार समितीसह विटा, इस्लामपूर बाजार समितीसाठी शुक्रवारी (ता. २८) सकाळपासून मोठ्या उत्साहात मतदान सुरू झाले. सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी दुपारी बारापर्यंत ४१.५७ टक्के मतदान झाले होते.

सायंकाळी पाच वाजता मतदान प्रक्रिया संपली. त्या वेळी सांगलीत ८६७३ मतदारांपैकी ८१०५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. बाजार समितीसाठी एकूण ९३,४५ टक्के मतदान झाले. तीनही बाजार समित्यांसाठी चुरशीने मतदान झाले. मतदान केंद्रांवर बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

सांगली बाजार समितीसाठी २४ केंद्रे तर इस्लामपूरसाठी १८ मतदान केंद्रे होती. दरम्यान, पलूस आणि शिराळा बाजार समितीची निवडणूक बिनविरोध झाली असून पलूसमध्ये काँग्रेस तर शिराळात राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आली आहे.

सांगली बाजार समितीचे कार्यक्षेत्र मिरज, कवठे महांकाळ आणि जत या तीन तालुक्यांत आहे. त्यामुळे सांगली समितीत महाविकास आघाडी आणि भाजप अशी लढत होत आहे. पालकमंत्री सुरेश खाडे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह खासदार, आमदार आणि माजी आमदार यांची रायकीय प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

 Election
Pune APMC Election : पुणे बाजार समितीसाठी ६७.८२ टक्के मतदान

मतदान केंद्रावर मतदारांचीही गर्दी दिसत होती. सांगली बाजार समितीसह इस्लामपूर, विटा बाजार समितीची निवडणूक चुरशीने होत असल्याने सर्व पक्ष मतदारांना मतदानासाठी केंद्रावर घेऊन येत असल्याचे चित्र होते. इस्लामपूर बाजार समिती ४७५२ मतदारांपैकी ४११४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. एकूण ८६.५७ टक्के मतदान झाले.

विटा बाजार समितीसाठी एकूण मतदान ३१२६ मतदारांपैकी २८५४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. एकूण ९१.३० टक्के मतदान झाले. शनिवारी (ता. २९) मतदान मोजणी होणार असून मातब्बर कोणाला धक्का बसणार याची उत्सुकता लागली आहे.

कोल्हापुरात दुपारपर्यंत ७० टक्के मतदान

कोल्हापूर : येथील शेती उत्पन्न बाजार समितीसाठी शुक्रवारी (ता. २८) चुरशीने मतदान झाले. जिल्ह्यातील ७० केंद्रांवर दुपारी तीन वाजेपर्यंत ७९ टक्के मतदान झाले. निवडणुकीत १८ जागांसाठी एकूण ५१ उमेदवार रिंगणात आहेत.

बाजार समितीचे कार्यक्षेत्र सहा तालुक्यांत आहे. यात करवीर, भुदरगड, कागल, राधानगरी, शाहूवाडी व पन्हाळा या तालुक्यांत मतदान झाले. शुक्रवारी सकाळी आठ वाजल्यापासून मतदानास सुरुवात झाली. ग्रामपंचायत, विविध कार्यकारी सेवा संस्था, व्यापारी अडते, माथाडी अशा गटांमधील उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. त्यांना ग्रामपंचायत सदस्य, सेवासंस्था, व्यापारी अडते, माथाडी सदस्यांनी मतदान केले.

 Election
Nashik Apmc Election Update : नाशिक जिल्ह्यात प्रचार शिगेला पोहोचला

शहरात जाधववाडी येथील प्रिन्स शिवाजी विद्यालयात मतदान झाले. केंद्रास माजी मंत्री हसन मुश्रीफ, राजेश क्षीरसागर यांनी भेट दिली. सकाळी लवकरच मतदारांनी गर्दी केल्याने दुपारपर्यंत बहुतांश मतदान संपले होते.

सत्तारूढ दोन्ही काँग्रेससह जनसुराज्य शक्ती, शिंदे व ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखालील शिवसेना विरुद्घ भाजप, राष्ट्रवादीतील बंडखोर व शिंदे गटाचे उर्वरित नेते अशी लढत होत आहे. दुरंगी लढत असली तरी विविध तालुक्यांत लोकप्रतिनिधींचे गट विभागले गेल्याने दोन्ही पॅनेलमध्ये एकाच लोकप्रतिनिधीला मानणारे गटही स्थानिक पातळीवर असल्याचे चित्र आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com