Fertilizer Rate : पोटॅशसह इतर खतांच्या दरात झपाट्याने वाढ

Chemical Fertilizer : सध्या खरीप हंगामात लागवड झालेल्या पिकांची वाढीची अवस्था सुरू झाली आहे. त्यामुळे सर्वत्रच विविध रासायनिक खतांची मागणी वाढू लागली आहे.
Fertilizer
FertilizerAgrowon
Published on
Updated on

Akola News : सध्या खरीप हंगामात लागवड झालेल्या पिकांची वाढीची अवस्था सुरू झाली आहे. त्यामुळे सर्वत्रच विविध रासायनिक खतांची मागणी वाढू लागली आहे. अशातच कृषी केंद्रांवर खरेदीसाठी गेलेल्या शेतकऱ्यांना खत दरवाढीचा फटका सहन करावा लागतो आहे.

मागील काही दिवसांत मागणी असलेल्या खतांची दरवाढ झालेली असून त्याची अंमलबजावणीही तत्काळ होत आहे. प्रामुख्याने केळी, कपाशी व इतर प्रमुख पिकांसाठी वापर असलेल्या पोटॅशचा दर प्रतिबॅग आता १८०० रुपयांवर जाऊ पोचला आहे. इतरही खते कमी-अधिक प्रमाणात वाढल्याने शेतकऱ्यांचा खिसा खाली होत आहे.

Fertilizer
Fertilizer Buffer Stock : ‘बफर स्टॉक’मधून १३०२ टन युरिया खुला

सध्या पिकांना मात्रा देण्यासाठी मोठ्या प्रमाणात खतांची मागणी वाढलेली आहे. कृषी केंद्रावर शेतकरी खतांसाठी गर्दी करीत आहेत. काही भागात आधीच १०.२६.२६, युरिया, डीएपी या मागणी असलेल्या खतांची उपलब्धता नाही. असेल तर यापैकी काही खते ही दुसरी खते घेतल्याशिवाय दिली जात नाहीत, तर कुठे पुरवठाच झालेला नाही, अशी वस्तुस्थिती आहे.

पिकांमध्ये फळधारणा, फळपरिपक्वतेच्या अवस्थेत पोटॅश या खताची मागणी वाढते. काही दिवसांपूर्वीच या खताचा दर १५३५ रुपयांवरून आता थेट १८०० रुपये एवढा करण्यात आला आहे. सोबत १५.१५.१५ हे १४७० वरून १६५० रुपये झाले आहे.

Fertilizer
Fertilizer : शेतकरी वापरत असलेल्या खते, खर्चावर संशोधन व्हावे

१०.२६.२६ चा दर आधी १४७० होता आता तो १८५० रुपयांपर्यंत पोचल्याचे विक्रेते सांगत आहेत. २०.२०.००.१३ हे खत १३०० वरून १४०० करण्यात आले. ८.२१.२१ हे खत आधी १८०० रुपयांनी विकले जायचे ते आता १९७५ रुपये एवढे झाले आहे. यासोबतच १६.१६ व इतरही खतांच्या किमतीत मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांचा पिकासाठीचा खर्च आणखीच वाढला आहे.

खतांच्या वाढत्या किमतींचा थेट परिणाम शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चावर होत आहे. आधीच बियाणे, मजुरी, कीडनाशके यांचे दर वाढले असताना आता खत दरवाढीमुळे शेतकऱ्यांपुढे आर्थिक अडचणी वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान सातत्याने दरवाढ होत असल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसतो आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com