Kharif Season Fertilizer Supply Update: आगामी खरीप हंगामासाठी देशात खतांचा पुरेसा साठा उपलब्ध असून, शेतकऱ्यांनी घाबरून खरेदी करण्याची गरज नाही, असा दावा आता केंद्र सरकारने केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रासायनिक खतांचा वापर २५ ते ५० टक्क्यांनी कमी करण्याचे आवाहन केल्यानंतर शेतकरी वर्गातून उमटू लागलेल्या उलटसुलट प्रतिक्रियांच्या पार्श्वभूमीवर केंद्राने ही भूमिका स्पष्ट केली आहे..मोदी यांच्या वक्तव्यांच्या अनुषंगाने केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी रासायनिक खतांचा वापर निम्म्याने कमी करूनही उत्पादन टिकवून ठेवणे शक्य असल्याचा विश्वास व्यक्त केला. एप्रिल २०२६ मध्ये युरिया, डीएपी (डाय अमोनियम फॉस्फेट), एमओपी (म्युरिएट ऑफ पोटॅश) आणि कॉम्प्लेक्स (संयुक्त) खतांची एकत्रित विक्री २३.५९ लाख टनांवर पोहोचली असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत त्यात सुमारे २५ टक्के वाढ झाली आहे..गेल्या वर्षी याच कालावधीत ही विक्री १८.९० लाख टन होती. डीएपी खतांच्या विक्रीत सर्वाधिक ५७ टक्के वाढ होऊन ती ३.४५ लाख टनांवर गेली. कॉम्प्लेक्स खतांची विक्री ४४ टक्क्यांनी वाढून ५.१५ लाख टन झाली. युरियाची विक्री १४ टक्क्यांनी वाढून १३.९३ लाख टन, तर एमओपीची विक्री १२ टक्क्यांनी वाढून १.०६ लाख टनांवर पोहोचली..Fertilizer Scam: जादा दराने खते, बियाणे विकणारी दुकाने तपासा.पंतप्रधान मोदी यांनी रविवारी शेतकऱ्यांना रासायनिक खतांचा वापर कमी करण्याचे आवाहन करताना, परदेशात युरियाची एक गोण सुमारे ३ हजार रुपयांना मिळते, मात्र भारतात सरकार अनुदान देऊन ती ३०० रुपयांपेक्षा कमी दरात उपलब्ध करून देत असल्याचे सांगितले होते. मातीचे आरोग्य खालावत असल्याने नैसर्गिक शेतीकडे वळण्याची गरज त्यांनी व्यक्त केली..पंतप्रधानांच्या वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत खत विभागाच्या अतिरिक्त सचिव अपर्णा शर्मा यांनी पश्चिम आशियातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर सुरुवातीला काही प्रमाणात घाबरून खत खरेदी झाली होती, असे सांगितले. मात्र देशातील खतस्थिती सध्या समाधानकारक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. खरीप २०२६ हंगामातील एकूण ३९०.५४ लाख टन मागणीच्या तुलनेत सध्याचा साठा ५१ टक्क्यांपेक्षा अधिक असल्याचे त्यांनी नमूद केले. सामान्यतः हा साठा ३३ टक्क्यांच्या आसपास असतो..मार्च-एप्रिल कालावधीत देशांतर्गत खत उत्पादन ७६.७८ लाख टन झाले असून आयात १९.९४ लाख टन राहिली. युरिया उत्पादन ४०.७२ लाख टन, डीएपी ५.३९ लाख टन आणि कॉम्प्लेक्स खत उत्पादन १३.६५ लाख टन झाले. एमओपीसाठी भारत पूर्णपणे आयातीवर अवलंबून आहे..Fertilizer Shortage: खरीप हंगामावर खतटंचाईचे सावट.अनुदानाची परिस्थितीखत अनुदानाबाबत शर्मा म्हणाल्या, की मागील आर्थिक वर्षात खत अनुदानाचा खर्च २.२१ लाख कोटी रुपये होता, तर २०२६-२७ साठी अर्थसंकल्पात १.७७ लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. मात्र जागतिक बाजारात युरियासह खतांच्या किमती वाढल्याने अंतिम अनुदान निश्चित करताना त्याचा विचार केला जाईल..युरियाच्या जागतिक किमतीत मोठी उसळीफेब्रुवारीनंतर जागतिक बाजारात युरियाच्या किमतींमध्ये मोठी वाढ झाली आहे. चीनमधील पुरवठ्याबाबतचे निर्बंध, पश्चिम आशियातील युद्धजन्य परिस्थिती आणि नैसर्गिक वायूच्या दरवाढीमुळे उत्पादन खर्च वाढला आहे. रशिया-युक्रेन युद्धानंतर आधीच खत बाजारपेठ अस्थिर झाली होती. त्यात पश्चिम आशियातील भू-राजकीय तणावाने आणखी भर पडली आहे..आयातीवर मदारभारत आपल्या खत गरजेपैकी मोठा हिस्सा आयातीद्वारे पूर्ण करतो. युरियासाठी सुमारे २५ टक्के, डीएपीसाठी ६० टक्के, तर पोटॅश खतांसाठी जवळपास संपूर्णपणे आयातीवर अवलंबून राहावे लागते. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमती वाढल्या की देशांतर्गत अनुदानाचा बोजाही वाढतो..देशातील परिस्थितीएप्रिलमध्ये खत विक्रीत २५ टक्के वाढडीएपी विक्रीत सर्वाधिक ५७ टक्के वाढखरीप हंगामासाठी तूर्तास ५१ टक्क्यांपेक्षा जास्त खतसाठा उपलब्ध असल्याचा सरकारचा दावा.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.