Soil Testing : माती परीक्षणाधारे खते वापराचा मिळणार सल्ला

Fertilizer Use : ‘आयसीएआर’ आणि कोरोमंडल यांच्यामध्ये संयुक्त करार
Soil Testing
Soil TestingAgrowon
Published on
Updated on

Soil Health : नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या (आयसीएआर) राष्ट्रीय मृदा सर्वेक्षण व भूमी वापर नियोजन संस्थेने खत उद्योगातील कोरोमंडल इंटरनॅशनल या कंपनीसोबत सामंजस्य करार केला आहे.

या करारांतर्गत माती परीक्षणाधारे पिकांच्या अन्नद्रव्य व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शक माहितीचा प्रसार महाराष्ट्रात करण्यात येणार आहे. विशेषतः मराठवाडा व विदर्भातील शेतकऱ्यांना त्याचा लाभ देण्यात येणार आहे. शेतकऱ्यांच्या शेतांची निवड करून त्या ठिकाणी प्रात्यक्षिके तसेच जागृती कार्यक्रमही घेण्यात येणार आहेत. मिळणारे शास्त्रीय परिणाम व प्रमाणीकरणाच्या आधारे मोबाइल तंत्रज्ञानाधारे निर्णय आधार पद्धती (डिसिजन सपोर्ट सिस्टिम) विकसित केली जाणार आहे. यामध्ये पिकांची निवड व अन्नद्रव्य व्यवस्थापन अंतर्भूत करण्यात आले आहे.

Soil Testing
Soil Testing : अन्नद्रव्य व्यवस्थापनासाठी माती परिक्षण आवश्यक

या संयुक्त कराराच्या अनुषंगाने नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात राष्ट्रीय मृदा सर्व्हेक्षण व भूमी वापर नियोजन संस्थेचे संचालक एन. जी. पाटील यांनी संस्थेचे ध्येय, पाच विभागीय केंद्रांमध्ये सुरू असलेले प्रकल्प याविषयीही माहिती विषद केली. ‘लॅंड रिसोर्स इन्वेन्टरी’च्या माध्यमातून मृदा तपशील व त्याआधारे शेतकऱ्यांना संस्थेद्वारा मार्गदर्शन केले जाणार आहे. कार्यक्रमात ‘कोरोमंडल’ कंपनीचे अन्नद्रव्य व्यापार विभागाचे वरिष्ठ कार्यकारी अधिकारी शंकरा सुब्रमणियन यांनी संतुलित पोषणद्रव्ये व्यवस्थापनाचे महत्त्व अधोरेखित केले. कार्यक्रमात ड्रोनचा वापर असलेली काटेकोर शेती. कार्बनी शेती आणि हवामानाला सुसंगत कौशल्यपूर्ण शेती आदी अन्य संयुक्त प्रकल्पांच्या अनुषंगानेही चर्चा झाली.


संशोधनासह प्रसारही
या करारामध्ये राष्ट्रीय मृदा सर्वेक्षण व भूमी वापर नियोजन संस्था माती परीक्षणावर आधारित माहिती तपशिलाची निर्मिती वा संकलन करणार आहे. त्या आधारे कोरोमंडल कंपनीकडून अन्नद्रव्य व्यवस्थापनाबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे. त्यातून मातीचे आरोग्य व पीक उत्पादकता वाढ ही उद्दिष्टे साध्य केली जाणार आहेत. संशोधनाची देवाणघेवाण, उत्कृष्ट समन्वय आणि शेतकऱ्यांना साह्य हे हेतूही या कराराद्वारे साध्य केले जाणार आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com