Fertilizer Sales : खतांच्या वाढत्या किमतीने शेती तोट्यात, लिंकिंग खत विक्रीने शेतकरी मेटाकुटीला

Farmers Production : शेतीच्या उत्पादनावर होणारा मोठा परिणाम त्यातच लिंकिंग खत विक्रीने शेतकरी पुरता मेटाकुटीला आला आहे.
Fertilizer Sales
Fertilizer Salesagrowon

Fertilizers Linking : मागच्या १० वर्षांच्या तुलनेत रासायनिक खतांच्या किंमतीत भरमसाठ वाढ झाली परंतु शेतीमालाच्या दरात म्हणावी तशी वाढ न झाल्याने शेतकऱ्यांचे गणित कोलमडल्याचे चित्र दिसून येत आहे. अस्मानी आणि सुलतानी अशा दुहेरी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना आता खतांच्या वाढत्या किंमतींना सामोरे जाण्याची वेळ येत आहे.

युरियाचे दर सोडल्यास प्रत्येक रासायनिक खतांच्या गोण्यांच्या किंमती १५०० रुपयांच्या पुढे गेल्याने शेतकऱ्यांना १ एकरी वर्षाला ४० हजारांच्या खतांसाठी पिकांना मोजण्याची वेळ आली आहे.

बदलत्या हवामानामुळे शेतीच्या उत्पादनावर होणारा मोठा परिणाम त्यातच लिंकिंग खत विक्रीने शेतकरी पुरता मेटाकुटीला आला आहे. खत उत्पादक कंपन्यांनी मनमानी करत रासायनिक खतांच्या किमतीत भरमसाट वाढ केली आहे. त्यामुळे शेतीतून मिळणारे उत्पन्न आणि खर्च यांचा ताळमेळ घालणे अवघड बनले आहे. रासायनिक खतांच्या किमती वाढल्याने पिके कशी घ्यायची आणि उत्पादन कसे काढायचे, या विवंचनेत शेतकरी आहेत.

शेतीची मशागत करून पिकांची व उत्पादनाची वाढ व्हावी, यासाठी शेतकरी रात्रंदिवस शेतात राबतो. पेरणीवेळी खतांची टंचाई निर्माण होईल, असे गृहीत धरून बँक व सेवा सोसायटीकडून कर्ज घेऊन रासायनिक खते खरेदी केली जातात. खतांच्या किमती वाढल्याने कर्जातही वाढ करावी लागत आहे.

त्यामुळे व्याजाचा बोजाही शेतकऱ्यांच्या डोक्यावर पडत आहे. त्यामुळे शेती व्यवसाय नकोच, अशी मानसिकता वाढू लागली आहे. मात्र, नाइलाजास्तव शेती करावी लागत आहे. शासनाने रासायनिक खतांच्या किमती कमी कराव्यात आणि खत कंपन्यांच्या मनमानीला चाप लावावा, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.

Fertilizer Sales
Kolhapur Dam : कोल्हापूर जिल्ह्यात गतवर्षीपेक्षा अधिक पाणीसाठा, शेतीसाठी दोन आर्वतने मिळणार?

खतांचे दर असे

सुफला : १४७० रु.

१०-२६-२६ : १४७० रु.

डीएपी : १३५० रु.

एमओपी : १७०० रु.

युरिया : २६६ रु.

सुपर फॉस्पेट : ६०० रु.

खत कंपन्यांची मनमानी

खतांच्या लिंकिंगच्या मनमानीबाबत अनेक बैठका झाल्या; पण पुन्हा येरे माझ्या मागल्या.. असे करत २०१५ पासून नऊ वर्षे खासगी खतनिर्मिती कंपन्यांची मनमानी सुरू आहे. या कंपन्यांवर कारवाई होणे आवश्यक आहे. उत्पादन खर्च वाढल्याने मोबदल्यात घट झाली आहे. त्यातच लिंकिंग देऊन खतनिर्मिती कंपन्या नको असणारी खते व इतर औषधे माथी मारत असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com