Solar Scheme
Solar SchemeAgrowon

Solar Scheme : दहा अश्वशक्ति कृषीपंपधारक शेतकऱ्यांना वीजबिल माफ होणार का? फडणवीस म्हणाले...

राज्यातील साडेसात अश्वशक्तीच्या कृषीपंपधारक शेतकऱ्यांना वीज बिल माफी देण्यासाठी मुख्यमंत्री वीज सवलत योजनेची घोषणा अतिरिक्त अर्थसंकल्पात अर्थमंत्री अजित पवारांनी केली आहे. परंतु त्यामध्ये साडेसात अश्वशक्ति कृषीपंपधारकांचा समावेश आहे.
Published on

राज्यातील दहाअश्वशक्तीचा कृषीपंप वापरणाऱ्या शेतकऱ्यांना देखील वीज बिलात सूट देण्याचा विचार आम्ही करू, असं आश्वासन राज्याचे उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिले आहे. ते बुधवारी (ता.३) राज्यपालांच्या अभिभाषणाच्या ठरावाला पाठींबा देताना विधानपरिषदेत बोलत होते. राज्यातील साडेसात अश्वशक्तीच्या कृषीपंपधारक शेतकऱ्यांना वीज बिल माफी देण्यासाठी मुख्यमंत्री वीज सवलत योजनेची घोषणा अतिरिक्त अर्थसंकल्पात अर्थमंत्री अजित पवारांनी केली आहे. परंतु त्यामध्ये साडेसात अश्वशक्ति कृषीपंपधारकांचा समावेश आहे. त्यामुळे दहा अश्वशक्ति कृषीपंपधारकांचा त्यामध्ये समावेश करावा, अशी मागणी विरोधकांनी केली.

यावेळी फडणवीस म्हणाले, "शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्यात एकूण ४७ लाख कृषीपंप आहेत. त्यापैकी ४४ लाख कृषीपंप साडेसात अश्वशक्तीच्या आतील आहेत. या ४४ लाख कृषीपंपधारकांना वीज बिल माफ करण्यात आलं आहे." असं फडणवीस म्हणाले.

पुढे ते म्हणाले, " तीन लाख पंपांनी फार फरक पडेल, असं राज्य सरकारला वाटत नाही. परंतु राज्य सरकारला सिंचन उपशावर निर्बंध आणायची आहेत. सगळे साडेसात अश्वशक्ति कृषीपंपधारक जर दहा अश्वशक्ति कृषीपंपावर गेले. तर अधिक उपसा सुरू झाला तर मोठ्या अडचणी निर्माण होतील. तथापि, दहा अश्वशक्ति कृषीपंप धारकांना काही वेगळा अनुदान देता येईल का याचा विचार राज्य सरकार जरूर करेल." असंही फडणवीसांनी सांगितलं.

Solar Scheme
Devendra Fadanvis: शेतकऱ्यांचं हित जपणारे निर्णय मोदींनी घेतल्याचा फडणवीसांचा दावा; शेतमालाच्या निर्यात बंदीचा मात्र विसर

दरम्यान, विधानसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सरकार घोषणाबाजी करत असल्याचा आरोप विरोधक करत आहेत. यापूर्वी अंतरिम अर्थसंकल्पात मोफत वीज मिळावी यासाठी राज्य सरकारने मागेल त्याला सौर कृषीपंप योजनेची घोषणा केली होती.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com