Bamboo Farming : शेतकऱ्यांनी बांबूलागवड केल्यास चांगले उत्पन्न मिळेल

Bamboo Production : मुळशी तालुक्याच्या पश्चिम भागातील डोंगरदऱ्यांत पूर्वीपासून बांबूचे क्षेत्र आहे. त्यापासून अनेक शेतकरी उत्पन्न घेत आहेत.
Bamboo Farming
Bamboo FarmingAgrowon
Published on
Updated on

Pune News : मुळशी तालुक्याच्या पश्चिम भागातील डोंगरदऱ्यांत पूर्वीपासून बांबूचे क्षेत्र आहे. त्यापासून अनेक शेतकरी उत्पन्न घेत आहेत. परंतु येत्या काळात शेतकऱ्यांनी पिकासारखे उत्पन्न म्हणून त्याची लागवड केल्यास चांगले उत्पन्न मिळू शकेल, असे आवाहन माजी आमदार शरद ढमाले यांनी केले.

तालुका कृषी विभाग, पंचायत समिती व तालुका शेतकरी संघ यांच्या वतीने पौड येथे बांबू लागवड कार्यशाळा शनिवारी (ता. २८) आयोजित करण्यात आली होती. त्या वेळी श्री. ढमाले बोलत होते. या वेळी जिल्हा परिषदेचे माजी गटनेते शांताराम इंगवले, कारखान्याचे माजी संचालक धैर्यशील ढमाले, गटविकास अधिकारी सुधीर भागवत, ‘आत्मा’चे पुणे जिल्हा प्रकल्प संचालक श्रीधर काळे, जिल्हा अधीक्षक आलोक बाणखीले, शिवसेना तालुकाप्रमुख सचिन खैरे, भाजपचे अध्यक्ष राजाभाऊ वाघ, अलका ववले, महादेव मरगळे, लक्ष्मणराव ढमाले, राम गायकवाड, भाऊ आखाडे, लक्ष्मण निकटे, दत्तात्रय उभे, भाऊ आखाडे, साहेबराव भेगडे उपस्थित होते.

Bamboo Farming
Bamboo Farming : पृथ्वी रक्षणासाठी बांबू शेती उपयुक्त : पाशा पटेल

तालुका कृषी आधिकारी हनुमंत खाडे म्हणाले, की शासनाने या वर्षीपासून बांबूसाठी हेक्टरी साडे सात लाख रुपये अनुदान सुरू केले आहे. लागवडीपासून तीन वर्षांत ते देण्यात येते. एकदा लागवड केल्यास साठ वर्षे उत्पन्न मिळते. तालुक्याच्या पश्चिम भागातील हवामान बांबूसाठी पोषक आहे. तेथील तरुण शेतकऱ्यांनी पुढाकार घ्यावा.

Bamboo Farming
Bamboo Planting Workshop : पौडमध्ये बांबू लागवड कार्यशाळा

वेल्हे तालुक्यातील शिवतोरण बांबू कंपनीचे संचालक गणपत गुजर म्हणाले, की बांबूला देशभर मागणी असते. त्याला चांगला भाव मिळतो. वेल्हे तालुक्यातील शेतकऱ्यांना एकत्र येऊन कंपनी स्थापन केली. तोडणी झाल्यावर प्रक्रिया करून देशभर विक्री केली जाते. असा प्रयोग मुळशी तालुक्यात यशस्वी होऊ शकतो.

कृषी तज्ज्ञ रमेश मोगल म्हणाले, की तालुक्यात मेस जातीचा बांबू चांगला येतो. पडीक माळरान व खाचरातही बांबूचे पीक घेऊ शकता. पहिल्या वर्षी शेणखत व पाणी व्यवस्थापन केल्यास चार वर्षात तोडणी होऊन चांगले उत्पन्न मिळू शकते. प्रास्ताविक राजेंद्र मारणे यांनी केले. तर सूत्रसंचालन भाऊ केदारी यांनी केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com